नाम तुझे घेता मुखी
भय दुःख निवारण
देई मना प्रसन्नता
करी आनंदित मन
केली मदत रामास
नाम तुझे हनुमंत
उचलला द्रोणगिरी
असा तूची बलवंत
सर्व सौख्य होतो लाभ
तुझ्या नामस्मरणाने
मन होते बलवान
मिळे शक्ती दर्शनाने
तूची केसरी नंदन
अन अंजनीचा सूत
असे निस्सीम हा भक्त
श्रीरामाचा असे दूत
भुत प्रेत भय हारी
रोग व्याधी होती दूर
घेता तव नाम ओठी
थांबे मनाची काहूर
वैशाली वर्तक
जय जय हनुमान
नाम तुझे घेता मुखी
भय दुःख निवारण
देई मना प्रसन्नता
करी आनंदित मन
केली मदत रामास
नाम तुझे हनुमंत
उचलला द्रोणगिरी
असा तूची बलवंत
सर्व सौख्य होतो लाभ
तुझ्या नामस्मरणाने
मन होते बलवान
मिळे शक्ती दर्शनाने
तूची केसरी नंदन
अन अंजनीचा सूत
असे निस्सीम हा भक्त
श्रीरामाचा असे दूत
भुत प्रेत भय हारी
रोग व्याधी होती दूर
घेता तव नाम ओठी
थांबे मनाची काहूर
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा