शनिवार, २४ ऑगस्ट, २०१९

कृष्णलीला व त्याची नवीन नांवे

श्रीकृष्णाच्या लीला
व त्याची नवीन नांवे

सोड वाट
"नंदलाला"
जाऊ दे ना
बाजाराला.

सोड "कृष्णा "
तू ओढणी
आल्या बघ
गवळणी

"बंसीधर"
वृंदावनी
  वेणु वाजे
रानी वनी

नाव तुझे
रे "माधवा"
राही मुखी
तो गोडवा

यशोदेचा
"घननीळा"
वाटे तिला
लडिवाळा

वाजविता
वेणु "कान्हा"
गाईनांही
फुटे पान्हा

खेळ चाले
चेंडू फळी
"घनश्याम"
नील जळी

"राधेश्याम"
काढी खोडी
दुभत्याचे
माठ फोडी.

रास लीला
गोपी संग
रणछोड
त्यात  दंग

विश्वरुप
पाही मैया
दाखविता
तो "कन्हैया"

वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...