अवजार
आला मनीं सहज विचार
कृपा असूनी अवजारांची अपार
न मिळता वेळेवर अवजार
होई खोळंबा कामाचा फार
दिसण्यास असे साधी हातोडी
पण ती न मिळता हातासरशी
उडे तारांबळ सर्व जनांची
साधा खिळा , ठोकण्या मन तरसी
जर पुकारला संप अवजारांनी
नाही आज हजर , आम्ही कामावरी
त्रेधा तिरपीट उडेल मानवाची
कसे, काय, करु आता कुठवरी
पक्षी, पशु , प्राणी , कीटक
नाही अवलंबीत अवजारावर
सुगरण पक्षी विणे तिचे घरटे
तर सुतारपक्षी , चोचीच्या बळावर
आदि काळी बनविली मानवाने
अवजारे कापण्या तोडण्या दगडातूनी
आता ती अवजारे पडली मागे
शोध घेता नव्याचा ,..जुन्यातूनी
करवत , प्रहार, कुदळ , नांगर
कारागीर संभाळी तयांना जपून
करे तयांचे जतन सदाकाळ
अमावस्येला विश्रांती देऊन
अवजारात नसे लहान वा मोठे कोणी
वैशिष्ठयानुसार ती येती कामी
रहीम वदती दोह्यात , ऐक वैशाली
जेथे हवी सुई , तलवार ठरे निकामी .
वैशाली वर्तक
आला मनीं सहज विचार
कृपा असूनी अवजारांची अपार
न मिळता वेळेवर अवजार
होई खोळंबा कामाचा फार
दिसण्यास असे साधी हातोडी
पण ती न मिळता हातासरशी
उडे तारांबळ सर्व जनांची
साधा खिळा , ठोकण्या मन तरसी
जर पुकारला संप अवजारांनी
नाही आज हजर , आम्ही कामावरी
त्रेधा तिरपीट उडेल मानवाची
कसे, काय, करु आता कुठवरी
पक्षी, पशु , प्राणी , कीटक
नाही अवलंबीत अवजारावर
सुगरण पक्षी विणे तिचे घरटे
तर सुतारपक्षी , चोचीच्या बळावर
आदि काळी बनविली मानवाने
अवजारे कापण्या तोडण्या दगडातूनी
आता ती अवजारे पडली मागे
शोध घेता नव्याचा ,..जुन्यातूनी
करवत , प्रहार, कुदळ , नांगर
कारागीर संभाळी तयांना जपून
करे तयांचे जतन सदाकाळ
अमावस्येला विश्रांती देऊन
अवजारात नसे लहान वा मोठे कोणी
वैशिष्ठयानुसार ती येती कामी
रहीम वदती दोह्यात , ऐक वैशाली
जेथे हवी सुई , तलवार ठरे निकामी .
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा