काव्यांजली स्पर्धेसाठी
- शेतकरी राजा 5/2/2019
बळीराजा माझा
पडता मृगाचे पाणी
बीजांकुर पाहूनी
आनंदितो.
अन्नदाता म्हणोनि
नमन करितो तुजला
पोषितो मजला
तवकृपे
मातीचा मित्र
रमतो काळ्या मातीत
पिकवण्या शेत
जनासाठी.
शेतकरी राजा
तुजला पोशिंद्याचा मान
देशाची शान
राखतोसी
करुनी काबाडकष्ट
काळ्या मातीला सजवितो
मोती पिकवितो
शिवारी
सदा कर्जदार
आणितो बीज बियाण
लागते ग्रहण
सुगीदिनी
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा