बुधवार, ५ सप्टेंबर, २०१८

ज्वारीचे कणीस

नातवास देण्यास प्रात्यक्षिक ज्ञान
कशी येते भाकरी ताटात
 शेतकरी करतो पेरणी कशी
कणसे कशी डौलतात शेतात

सहज टाकले ज्वारीचे दाणे चार
रोज देता पाणी तयास नियमित
रुजलेकी दाणे जमिनीत छान
इवलेसे अंकुरले कोंब काही दिवसात

पहाता पहाता वाढले ते रोप
दिसेल ना डौलदार कणीस एकतरी
याची वाट पाहिली दोघांनी मिळूनी
पण आज सहज लक्ष जाता
दिसले की दाणेदार कणीस उंचावरी
पाहून झाला आनंद अमुच्या मनीं

वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...