आभाळ 17/3/2018
निर्मीले देवाने आकाश
व्यापिले आभाळ तयात
दोन्ही छत्रा सम जगतास
तया खाली वसे, विश्व महान.
सारे विश्व असे एक कुटूंब
निर्मीली भावना जगतात
देऊन एकच आभाळ अवनीस
भावना दिधली, "वसुधैव कुटुंबकम्"
आकाश , दाविते उंची तयाची
विशालता पहावी आभाळाची.
जिची न होई, माप-मोजणी
माया करावी ,आभाळागत जगती.
आभाळ असे ढगांचे अंगण
अमाप ढगांना घेई सामावून
दाहकता सूर्याची घेई शोषून
मायेचे घालीते जगास पांघरुण
येता भरुन, आभाळ ढगांनी
कधी सूर्याशी,तर कधी चंद्राशी
खेळ चाले तयांचा ढगांशी
सौदामिनी दावीती नृत्य मधूनी
पाहूनी दाटिलेले आभाळ
उत्तेजित होती कवी,चित्रकार
वर्णावया घेती लेखणी सरसावून
छटा रंगवती ,तयांच्या कूंचल्यातून
असे असती आभाळ मायेचे,
आक्रमिता कृष्ण मेघांनी 'ते
पाही कृषिवल हर्ष मनान
े बरसा रे मेघांनो मातीते
बीज अंकुरेल, मग तयाते
बीज अंकुरेल ,मग तयाते.
.............. वैशाली वर्तक . १८/३/२०९
प्रेमाची अक्षरे साहित्य समुह आयोजित
उपक्रम
अष्टाक्षरी रचना
विषय -- आभाळ
देवे निर्मिले आकाश
व्यापे आभाळ नभात
छत्रा सम जगतास
सारे एकची विश्वात
सारे विश्व हे कुटूंब
दिले नभ अवनीस
तया खाली वसे विश्व
समानता दावण्यास
दावी उंची आकाश ते
आभाळाची विशालता
जिची न होई मोजणी
हवी आभाळ ममता
ढगांसाठी ते आंगण
ढग जाती सामावून
दाहकता ती शोषून
माया रुपी पांघरुण
भरलेल्या आभाळात
रंगे ढगांचा तो खेळ
कधी सूर्य वा चंद्राचा
जमे छान सदा मेळ
दाटलेल्या आभाळाने
होती प्रभावित कवी
कल्पनेच्या कुंतल्याने
जिथे न जाई तो रवी
असे आभाळ मायेचे,
मोदे कृषिवल पाही
येता कृष्ण मेघ नभी
आनंदास सीमा नाही
वैशाली वर्तक
अ भा म सा मंडळ कराड आयोजित
उपक्रम शब्दफुले
विषय - *आभाळ*
अष्टाक्षरी रचना
देवे निर्मिले आकाश
व्यापे आभाळ तयास
असे एकची विश्वात
छत्रा सम जगतास
सारे विश्व हे कुटूंब
दिले नभ अवनीस
तया खाली वसे विश्व
समानता दावण्यास
दावी उंची ते आकाश
आभाळाची विशालता
जिची न होई मोजणी
हवी ,आभाळ ममता
ढगांसाठी ते आंगण
ढग जाती सामावून
दाहकता ती शोषून
माया रुपी पांघरुण
भरलेल्या आभाळात
रंगे ढगांचा तो खेळ
कधी सूर्य वा चंद्राचा
जमे छान सदा मेळ
दाटलेल्या आभाळाने
होती प्रभावित कवी
कल्पनेच्या कुंचल्याने
जिथे न जाई तो रवी
असे आभाळ मायेचे,
मोदे कृषिवल पाही
येता कृष्ण मेघ नभी
आनंदास सीमा नाही
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा