एक साधी सरळ कविता
शतक
दहा वर शून्य शंभर,
पहिला माझा नंबर,
घोकून केले रटण,
बालपणी शतकच
खेळताना सापशिडी ,
शतक गाठण्या परि ,
कितीदा केले वर खाली ,
अंती पोहचले शतका वरी.
पुरता पुरविला पिच्छा ,
विद्याभ्यासात शतकाने ,
गुणांची मोजणी करिता ,
शतक अंकच आले पुढे
इतिहासात शतकानुसार
शतक सरते पुढे ,
एकोणीसाव्वे शतक मात्र
स्वातंत्र्य प्राप्तीचे ठरे
शतक मारण्याची
लागते चुरस फलंदाजांची
किती शतके मारलीत
टिपणीत नोंद करण्याची
देतांना हमी सुद्धा ,
शतकच येते पुढे ,
"शंभर टक्के खात्री देतो " म्हणत ,
उच्चारण होते शतकाचेच .
जीवनाचा कालखंड ,
गृहीत धरतात शतकात ,
शतायुष्यी होवो म्हणत
आशिष देतात झोकात
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा