सार
दोन अक्षरी शब्द , "सार "असे साधा
जैसा वापरावा , होतसेअर्थ तयाचा.
आहारात उत्तम, रुचकर असे हे सार
सेवनात अपूर्ण भासे, "सार " विणाचे ताट.
गुलाबीसर रंगाची , न्यारी "सार "ची वाटी,
ताटाची शोभा वाढवी, सदा शाही थाटाची .
सार पेय असे, चवदार अन् गुणकारी
भूक मंदावता ,आठव होई, खास तयाची
पाश्चात्त्य जेवणात , सरसावे स्टार्टर म्हणोनी
हलके पाचक गुणांचे , वैद्य सुचविती आवर्जूनी.
काढोनिया सकल ,सत्व गुण ,जिन्नसाचे
बनते सात्विक असे, "सार" तया चे
भाषेत शब्द ,"सार" सांगतो, वृत्ताचा सारांश
तात्पर्य म्हणोनि, "सार" वसे "इसाप" कथेत.
जीवन जगण्यात सुध्दा "सार" महत्वाचे,
समजून उमजून घ्यावे ,"सार" जीवनाचे.
दासरामांनी लिहिले , बोधपर श्लोक मनाचे
कथिले तयात मनाला , कसे वागावे, जीवनाते
होता विमुख पार्थ रणीं, धरी विषाद मनात
सांगे श्रीकृष्ण तयाला , "जीवन सार", रणांगणात.
उमजले जयांना, खरे गमक जीवनाचे
हा अर्थ "सार" चा वसतो, अध्यात्मकाते.
.
वैशाली वर्तक
दोन अक्षरी शब्द , "सार "असे साधा
जैसा वापरावा , होतसेअर्थ तयाचा.
आहारात उत्तम, रुचकर असे हे सार
सेवनात अपूर्ण भासे, "सार " विणाचे ताट.
गुलाबीसर रंगाची , न्यारी "सार "ची वाटी,
ताटाची शोभा वाढवी, सदा शाही थाटाची .
सार पेय असे, चवदार अन् गुणकारी
भूक मंदावता ,आठव होई, खास तयाची
पाश्चात्त्य जेवणात , सरसावे स्टार्टर म्हणोनी
हलके पाचक गुणांचे , वैद्य सुचविती आवर्जूनी.
काढोनिया सकल ,सत्व गुण ,जिन्नसाचे
बनते सात्विक असे, "सार" तया चे
भाषेत शब्द ,"सार" सांगतो, वृत्ताचा सारांश
तात्पर्य म्हणोनि, "सार" वसे "इसाप" कथेत.
जीवन जगण्यात सुध्दा "सार" महत्वाचे,
समजून उमजून घ्यावे ,"सार" जीवनाचे.
दासरामांनी लिहिले , बोधपर श्लोक मनाचे
कथिले तयात मनाला , कसे वागावे, जीवनाते
होता विमुख पार्थ रणीं, धरी विषाद मनात
सांगे श्रीकृष्ण तयाला , "जीवन सार", रणांगणात.
उमजले जयांना, खरे गमक जीवनाचे
हा अर्थ "सार" चा वसतो, अध्यात्मकाते.
.
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा