बुधवार, ७ डिसेंबर, २०१६

bhel

                                                      bhel 

   1      अग , चल ना ग अर्चना,हा पहा . भगिनी समाजाचा आनंद मेळा लागला आहे . चल जाऊ या आत  खादाडीला .

   2      हो चालेल , जाऊया की .
   1      अग बाई ! किती ही गर्दी .आणि तो कोणता स्टॉल आहे ग ? अतीच गर्दी आहे ना?
   2      अग तो ना ?' मुंबई भेळ"  अग भेळ म्हटले की गर्दी असणारच
   1      हो sss हो . ना भेळ पदार्थच असा कीं पोटभर   जेवण झाले असेल तरी भेळ ची एखादी डिश खायला काहीच हरकत नसते .
   2      अग रामकृष्ण परमहंसांचे आहे ना उदाहरण .त्यांचे जेवण झाले होते .मला आता काही नको म्हटले .पण त्यांच्या शिष्यांनीं जिलबीची डिश समोर 
           धरली ,तर त्यांनी चक्क जिलबी घेतली की  व त्यांना विचारले तर म्हणाले
   1      हो माहित आहे मला ते .  मी पण वाचले आहे . ते म्हणाले कि कलकत्यात रस्त्यात तुफान गर्दी पण  गव्हर्नरची गाडी आली तर गर्दी   आजूबाजूला होऊन
           त्यांची गाडी पुढे निघून जाते ,तसेच जिलबीचे आहे . आवडती वस्तू म्हटली कि पोटात जागा होतेच
   2      हं म्हणजे !त्या भेळला पण भर पेट असता जागा होते तर .
   1     हो ना अर्चना भेळ पदार्थच मुळात रुचकर , नुसता तोंडाला चव नाही तर भूक चालविणारा पदार्थ आहे
   2      खरच ग . चुरमुरे कुरमुरे त्यात वाफविलेल्या बटाट्याचे तुकडे ,बारीक चिरलेला टॉमेटो, ,मैद्याच्या पूरीचे तुकडे , फरसाण व त्यात आंबट  गोड
           चिंचेची चटणी आणि चवीला ,पुदिना हिरव्या मिरचीची तिखट चटणी ,व या तयार मिश्रणावर बारीक चिरलेला कांदा व वरून बारीक भरभुरलेली
           बारीक शेव
    1     अग थांब  आणि वर लालबुंद डाळिंबाचे दाणे
    2     काय शोभिवंत दिसते ना भेळ? नुसते वर्णन एकूण तोंडास पाणी सुटले ना ?
    1     खर च "भेळ " म्हणजे मिश्रण .
    2     हो ना . निवडक पदार्थांचे योग्य प्रमाणात मिश्रण म्हणजे भेळ .
    1     तसे  पाहिले तर स्वयंपाक कृतीत  पण अनेक पदार्थांचे मिश्रणच असते ना .  
    2     हो व त्या विविघ खाद्य पदार्थांच्या मिश्रणाने खाद्य पदार्थ तयार होतो .
    1     आणि हो पदार्थास चव आणण्यात अनेक मसाल्यांच्या पदार्थाची म्हणजे लवंग ,तमाल पत्र  दालचिनी वगैरे मसाल्यांचे एकत्रीकरण करून  अथवा
            गरम  पदार्थांचीभेळ करून मग ते तयार मसाले खाद्य पदार्थाची रसना वाढवण्यास मदत रूप होतात ,
    2      एवढेच काय भौतिक शास्त्रात पहा ना . धातूंच्या मिश्रणात दोन व अधिक धातूंचे एकत्रीकरणाने  व भेळ  करून धातू बनते .
    1       आणि त्या धातूचे वाहतुकीच्या साधनात , औद्योगिक क्षेत्रात अनेक ठिकाणी वापरण्यात येतात .
    2      आणि अग रसायन शास्त्रात तर निव्वळ अनेक घटकांची भेळच असते . अनेक घटकांचे मिश्रण करून रसायनिक पदार्थ तयार होतात.
    1      हो ना साबण औषधे , कॉस्मेटिक ,पेस्ट ,मंजन पावडर वगैरे काय . तसेच रंगात नाही का तेल व इतर प्रवाही घटकांच्या मिश्रणाने रंग बनतात
    2      अग हो ना प्रवाही पदार्था  वरून आठविले की नैसर्गिक प्रवाही पदार्थ पाणी पहा ना . ते पण  हैड्रोजन व ऑक्सिजन वायूंचे मिश्रण आहे ना
    1      हो त्याच प्रमाणे इतर वायूंचे विघटन केले तर कळते त्यात पण दोन व अधिक घटकांची भेळ / मिश्रण च आहे .
    2     म्हणजे नैसर्गिक पदार्थ पण योग्य प्रमाणात भेळ  व मिश्रण स्वरूपात आहेत
    1     अग कापड उद्योगात पण भेळ असतेच की .सुती  व सिंथेटिक धाग्यांचे मिश्रण असतेच ना व जेव्हा असे मिश्रण नसते तेव्हा संपूर्ण वा प्युअर सिल्क
    2      अथवा पूर कॉटन  असे लेबल लावतात ,
    1      सूर्य प्रकाशाचे किरण पावसाच्या थेंबातुन पसार होते तेव्हा त्या प्रकाशाचे पृथकरण  होऊन सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसते. म्हणजे सूर्याचा च प्रकाश . सूर्य
           किरण  पण सात रंगाचे मिश्रण व भेळ च आहे ना
    2     एवढेच  काय वैशाली आपले शरीर नाही का पंच महाभूतांचे योग्य प्रमाणात मिश्रण होऊन बनले आहे ना . जरा  समतोलता कमी जास्त झाली
           तर आरोग्याचे तंत्र बिघडते .
    1    हो तर खर् च  आहे . आपण बोलतो, लिहितो ,भाष्य करतो. त्यात शब्दांचा योग्य समूह असतो , त्यात पण योग्य शब्दांचे एकत्रीकरण करून जोड
           शब्द तयार होतो. हे जोड शब्द वा शब्दांचे मिश्रण , भाषेचा दर्जा वाढवितात  त्या त्या भाषेच्या व्याकरणात भर करतात.  भाषेला समृद्ध करतात
            नाही का ?
    2     हो ना पंच पाळे , त्रिमूर्ती , नवरात्री ,वगैरेजोड शब्द  भाषेच्या व्याकरणात , समास तयार करतात , तसेच अनेक शब्दास एक शब्द देऊन जसे
           गजानन - ज्याचे मुख गजासारखे आहे , मिनाक्षि -जिचे डोळे माशा प्रमाणे आहेत असे समास जोडशब्द  व शब्दांचे मिश्रण /भेळ  असते
           जिच्याने भाषे दर्जा उंचवितो , वाढतो
     1    हो म्हणजे भेळ सर्वत्र असते तर . म्हणजे भे आणि ळ  यात मात्र स  अक्षर नसावे , नाहीतर भेसळ शब्द तयार होतो  . व ती मात्र योग्य नाही
     2    हो ना जसे बांधकामात रेती सिमेंट चे योग्य प्रमाणात भेळ केली पाहिजे नाहीतर बांध काम कच्चे होते ,
     1    सोनाराने सोन्याचे दागिने बनविताना त्यात तांबे चांदी चे प्रमाण योग्य नाही ठेविले तर सोन्याचा कस कमी होतो. कारण दागिने बनवितांना तांबे टाका
           वेच लागते . पण सोन्याच्या कास कडे पण पाहिले पाहिजे .
    2    अग येतेच काय खाद्य पदार्थात टीप कागद ,ब्लॉटींग पेपरचा क्रीम म्हणून वापर करणे . तो छोटुमल मोटुमल नाही का लस्सीत वापर करावयाचा
           मग पकडला गेला . तसे नसावे
    1    हो ना लाकडाचा भुसा मसाल्याच्या पदार्थात वापरणे , खाण्याच्या रंगात भेसळ करणे , ती भेळ नव्हे ती तर भेसळ आहे जी योग्य नाही
    2    हो ना  म्हणजे सर्व क्षेत्रात भेळ आहे पण  भेसळ नसावी
    1    तेव्हा ज्या ज्या क्षेत्रात भेळ करतांना  मिश्रण करतांना मानवाने थोडी नितीमत्तेची , पदार्थाच्या वा  उत्पादनाच्या गुणवत्तेची चाड ठेवली पाहिजे
    2    हो म्हणजे प्रत्येक क्षेत्रात  सुखद , सात्विक , चवदार, सकस  कसदार , पोषक पदार्थांची . उत्पादनाची  उत्तम भेळ अनुभवता येईल  नाही का .
    



गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

सार

                       सार
दोन अक्षरी  शब्द , "सार "असे साधा
जैसा  वापरावा ,  होतसेअर्थ तयाचा.

आहारात उत्तम, रुचकर असे  हे सार
 सेवनात अपूर्ण  भासे, "सार " विणाचे ताट.

गुलाबीसर रंगाची , न्यारी  "सार "ची वाटी,
ताटाची शोभा वाढवी, सदा शाही थाटाची .

सार पेय असे, चवदार अन् गुणकारी
भूक  मंदावता ,आठव होई, खास तयाची

पाश्चात्त्य जेवणात , सरसावे स्टार्टर म्हणोनी
हलके पाचक गुणांचे , वैद्य सुचविती आवर्जूनी.

काढोनिया सकल ,सत्व गुण ,जिन्नसाचे
बनते सात्विक असे, "सार" तया चे

भाषेत शब्द ,"सार" सांगतो, वृत्ताचा सारांश
तात्पर्य म्हणोनि, "सार"  वसे "इसाप" कथेत.

जीवन जगण्यात सुध्दा "सार" महत्वाचे,
समजून उमजून घ्यावे ,"सार" जीवनाचे.

दासरामांनी लिहिले , बोधपर श्लोक मनाचे
कथिले तयात मनाला , कसे वागावे, जीवनाते

होता  विमुख पार्थ रणीं, धरी विषाद मनात
सांगे श्रीकृष्ण तयाला , "जीवन सार", रणांगणात.

उमजले जयांना, खरे गमक जीवनाचे
हा अर्थ "सार" चा वसतो, अध्यात्मकाते.
.
                                                           वैशाली वर्तक

शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०१६

ઠંડો પાણીનો પ્યાલો

                                                               ઠંડો પાણીનો પ્યાલો
             માર્ચ મહિનાની 31 હતી, ગરમી થી જીવ  ઘબરાતો હતો। હું બેન્કે  આવી પોહંચી. આજે  સર્વિસનો છેલ્લો દિવસ હતો.એટલે  નિવૃત્તિ લેવાનો દિવસ. "આ , લો બેન પાણી, બોલીને પાણી ની પવાલી ધરીને, હીરાબેન સામે ઉભા હતા.એક ક્ષણ, એ પવાલી સામે જોતા ,મને બેન્ક જોઈન કરેલો દિવસ યાદ આવ્યો, જયારે હું લેખિત અને મૌખિક ઇન્ટરવ્યૂ પાસ કરી  appointment  letter માટે બેઠી હતી. મારા નામનું  ઉચ્ચારણ કરતા પટાવાળા ભાઈ   આવ્યા અને   બોલ્યા , તમને કેબીન માં બોલાવ્યા છે।  અંદર મેનેજર સાહેબે મને appointment letter આપ્યુ। અને પટાવાળા ભાઈએ પાણી નો ગ્લાસ સામે ધર્યો। એ દિવસ નો પેહલો  પાણી નો   ગ્લાસ અને  આજનો પાણીનો   ગ્લાસ.  હું sbi  નું  પાણી પીતી હતી. શું યોગાયોગ જુવો ,આ પેહલા અને છેવટના દિવસ ના ગ્લાસે  મારી સામે મારુ બાળપણ  આખુ આંખ  સામે ઉભું  કર્યું।           
          ક્ષણમાં મારી સામે શાલેય  જીવન યાદ આવ્યું। અમે નિશાળમાં રેસીસમાં પાણી પીવામાટે   લાઈન કરી ઉભા રહેતા। આપનો ક્રમ આવે ત્યાંરે જ આગળ આવવાનું,  પછીજ પાણીવાળા બેન દરેકને  પાણી આપતા હતા. એ વખતે હમણાંની જેમ પાણીની બોટલ ,લઇ જવાની રીત વધારે પ્રમાણમાં  પ્રચલિત ન હતી।  10 થી 5 નિશાળનો સમય રહેતો હતો. જેમાં બે નાની રેસીસ અને એક મોટી નાસ્તાની રેસીસ , મારુ ઘરતો   નિશાળની એકદમ  પાસે હતું , એટલું કે દોડતી જઈને બે મિનિટ માં પાણી પીઈ ને પાછી    નિશાળે આવી શકું।  મોટી રિસેસમાં તો હું ઘેર જતી હતી. જયારે મારી દાદી નાસ્તો આપતી।   અને દાદી તો માટલાને ચોખ્ખું કપડું લપેટી  એના  પર પાણી નાંખી કપડું કાયમ ભીનું રાખતી કે જેનાથી પાણી ઠંડુ  થાય ।  ક્યારે ક્યારેક તો પ।ણીમાં ખસ નાખી સુગંધીત  પાણી રાખતી।  મારી બેનપણીઓ  પણ મારા ઘેર પાણી પીવા આવતી હતી।  એવું બધું હોવા છતાં , અમારા  વર્ગમાં  એક જોશી અટકની છોકરી હતી।  નામ તો હવે  યાદ નથી.  એના પપ્પા નિશાળની  પાસે એક બેન્ક  હતી એમાં એ સર્વિસ કરતા હતા, એ છોકરી કાયમ કહેતી કે, હું તો   મારા પપ્પા પાસે બેન્કમાં જઉં છું  . પછી મારા પપ્પા પટ્ટાવાળા   ભાઈને   બોલાવે છે  અને એ ભાઈ  ઠંડુ  પાણી લાવે છે. અને બીજું કહું  અંદર આવી ઠંડક હોય છે।  સાંભળ ,તને મારી સાથે પાણી પીવા મારા પપ્પાના બેન્કે   આવવું  છે?  મેં અને તરતજ ખુશીથી હા પાડી।  તો, એ બોલી,' ઠીક   તો આપણે  જઈશું બેન્કે,  પાણી પીવા," પsss ણ , કરીને એ  રોકાઈ।  મેં પૂછ્યું।,'' શું થયું? એ બોલી," તારે મારુ એક નાનકડુ કરવું પડશે । જયારે મારુ  ગૃહકામ  બાકી હશે તો તારે મને મદદ  કરવી પડશે।" મેં  કહ્યું   ઓ  આટલુજને  ।   મને કાંઈ વાંધો નથી।  આમપણ  આપણે થોડાક  નિશાળ શરુ થતા પહેલા  આવીએ છીએ। તો ત્યારે,.........મેં કહયુ  હા હા એનામાશુ ! કાંઈ જ વાંધો નહિ।  એનું ઘર  પણ નિશાળ થી ધણી દુર હતું ।એટલે આવવા જવામાં  ઘણો  સમય જતો હતો. તો કેટલીક વખતે એનો ગૃહકામ બાકી રહી જાતું। પણ અમારું  નક્કી થયા મુજબ હું એને કાયમ બાકી ગૃહકામ  પૂરું કરવામાં મદદ કરતી હતી. અને નક્કી કર્યાં મુજબ એ મને  રિસેસ માં એના પપ્પાના બૅંન્કમાં પાણી પીવા લઈ જતી।
       અમે એના પપ્પાના બેન્કમાં જતા હતા. બેન્કનાં બારણે ઉભા રહેલા। સિકયુરિટી વાળા ને એ પોતાના પપ્પાનું   નામ કહેતી , અને પછીઅમે એના  પપ્પાના ટેબલ પાસે જતા।  અને પપ્પા અમને જોઈને પટાવાળા ભાઈને બોલાવીને કહેતા ," કે ઈન બચ્ચીઓન્કો પાણી દેના। "પછી પિત્તળના સ્ટેન્ડ માં સ્ટીલ ના ગ્લાસમાં ઠંડુ પાણી આવતું।  શું મજ્જા પડતી થી એ વખતે। આજુબાજુમાં  ટેબલ ખુર્ચીઓ અને કામ કરતા લોકો  . ઠંડા વાતાવરણ માં હજુ ઠંડુ કરવા ફરતા પંખાઓ। ઘણા વખત આવી રીતે પાણી પીવા ગઈ હોઈશ। સમય  વીતી ગયો।  એના  પપ્પાની ટ્રાન્સફર થઈ કે શું પછી યાદ નહિ।  હું પણ એને અમુક સમય પછી ભૂલી ગઈ।          
          પછી મેં પણ મારુ પ્રાથમિક શિક્ષણ પૂરું કર્યું।   પછી હાયસ્કૂલ નું અને પછી મહાવિદ્યાલયનું 
શિક્ષણ પૂરું કર્યું પદવીધર  થઈ। આગળ સર્વિસ માટે પ્રયાસ શરુ કર્યો। આગળ apply કરતા એ જ બેન્કમાં સર્વિક મળી।  જયારે બેનપણી સાથે  ગૃહકામ  કરી આપવાના બદલામાં પાણી પીવા જતી હતી , એ વખતે કયારે  વિચાર્યું   હતું કે આગળ એજ બેન્કમાં sbi માં હું 31/32 વર્ષ  પાણી પીવાની છું

शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०१६

panavaril dav bindu

                              पानावरील दव बिंदू

   पानावरचा दव बिंदू
   भासत होता मोती समान
   काय करता येईल तयातून
   विचार आले अनेक मनात .

  भासत होता पा-यासम ,
   भरून  घ्यावा  नळीत तयास,
  अन बनवावे  ताप - मापक ,
  मुलांना देण्या ज्ञान अगाध .
                शिक्षकी , विचार आला मनात .
                     
  बघत होता थेंबाकडे ,
  टकमक लावुनिया डोळे ,
  शमवेल आता तृष्णा माझी ,
  सरसावत तो आला पुढे .,
          कुणीएक , पक्षी  चातक ..

     कुणी सराफ मनी वदला ,
     मन:शांती साठी हाच हवा ,
     स्पर्श तयाचा होई कांतीला
    मोत्याची बनवू करांगुलीला .
                 चंद्रबळा   साठी  , हाच  बरा

     पाहूनी  त्या  दव बिंदूस
     कुणी  भक्त होऊनी  आकृष्ट ,
     मनीं  आला विचार तयास
     मस्तकींच्या मयूर पिसास .
                  शोभिवंत , मम् कान्हयांस .

      जवळ जाऊनी  होते निरखत ,
      शोभेल कीं , अपुल्या अंगठीत?
      का, अडकवून द्यावा  गळसरेत ?
      विचार आला मम हृदयात .            
                           अन हळूच , लाविला हात तयास

      निसटला की  हो  पानावरुनी ,
     निखळावा मोती धाग्यातुनी ,
    गेले विचार क्षणात  विखरूनी ,
     घरंगळले मनाच्या ओंजळींतुनी .
                  पानावरील दव बिंदू
                                                 भासत होता मोती सम.
                                           
                                    
                              
                            
                           
                             

रविवार, २१ ऑगस्ट, २०१६

अपेक्षा

                                                            अपेक्षा 
          जन्मास जसा येतो मानव 
          पडे  गळा , अपेक्षांची माळ 
          स्व अपेक्षा पूर्ती साठी,पालक 
          पाल्यावरती ,लादती भार सदाकाळ .

          बाल्य इच्छांना घालूनी  मुरड 
          चढा ओढी पायी ,पालक 
          हिरावूनि घेती , तयांचे बालपण  
          कधी आनंदाने खेळणार बालक

          जरी करिती कर्म अविरत 
          अपेक्षा विरहित  हवे आवश्य
         होता तयांचा , आकांक्षा भंग 
         पदरी पडते , नुसते नैराश्य .......

         समाधानाची मनी , खेचता लकेर 
        अपेक्षा  पूर्तीची नसे गरज
        कामात  न भासे , निरुत्साह 
        जोमाने कर्म होते सहज

        अपेक्षा सुवर्ण पदक प्राप्तीची 
         करतील सारे सदा यशाची
         तणाव न  घेता , तिने साकारावी 
         हीच अपेक्षा असावी , सदिच्छांची ......

         स्वच्छ  भारत व मेक इंडिया 
         आहेत मोदीजींच्या अपेक्षा 
         प्रयत्नांची  करू पराकाष्ठा 
         नागरिकांची हीच खरी परीक्षा.......

बुधवार, २७ जुलै, २०१६

nivaant क्षणभर थांब

                                                                   निवांत
        जून महिना होता. आकाशात काळे ढग गर्दी करू लागले होते . थंडगार वारा व पावसाने  दर्वळेला मातीचा सुगंध  जीवास प्रसन्न करत होता . वातावरण पण कसे आल्हादकारक भासत  होते .राधिका ऑफिस मधून परतत होती.  रस्त्यात चालतांना समोरच्या बाल्कनीत आजी व आजोबा खुर्च्या टाकून चहाचा एक- एक घोट घेत गप्पा करीत निवांतात बसलेले होते . राधिका मात्र पटपट पावले उचलत घराकडे धांव घेत होती . दिवसभराच्या दगदगीने थकलेली होती . तिला क्षणभर त्या निवांतात बसलेल्या आजी आजोबांचा हेवा वाटला .  थंड गार  वारा , हातात चहाचा कप , आजूबाजूला हलणारी झाडे , आकाशातील ढग, पंख पसरून उंच आकाशात  विहंग करणारे पक्षी  पहात निवांतात कसे  क्षण घालवीत आहेत ना !
       राधिका घरी आली . घरात येऊन मुलांचे व स्वत:चे ,चहा पाण्याचे पटकन आटपून रात्रीच्या जेवण्याचे  पाहू लागली . नवरा आल्यावर रात्रीची जेवणे आटपून बिछान्यावर आता निवांत पडली.   पण हा निवांतपणा म्हणजे  थकलेल्या  शरीरास विश्रांती देणारा निवांत क्षण होता . मानसिक विश्रांती तो खरा निवांतपणा . असे विचार करता करता राधिका निवांताच्या विचारात मग्न  झाली. व झोपी गेली.
      खरच ! आयुष्यभर  आपण नुसते भरघाव गतिने जीवन जगत असतो, नाही का? व त्या जीवनात आपण आनंद ,सुख शांती मिळावी याचा अतोनात प्रयत्न करत असतो . जीवाचा आटापिटा करत असतो .पण खर पहिले  तर  आनंद  काय, सुख , शांति  काय ,ही तर त्याच्या मनांतच दडलेली असतात.  मनांत नीट डोकावून पहिले तर हे सर्व त्याला त्याच्या मनाकडूनच मागितले  गेले  असते  वा इच्छित , अपेक्षित असते.व  आपले मन ते आपल्याला देऊ पण शकते व देत पण असते . पण आपली,प्रत्येक  माणसाची मानसिक भूक, गरज, वा तृष्णा असते ती निवांतता मिळवण्याची . तो निवांतपणा प्रत्येकास हवा हवासा वाटतो . रोजच्या चाकोरीतून सुटकारा  मिळवून  निवांत क्षण  मिळवण्याचा प्रयत्न करतो.त्यासाठी बरेचदा 10/15 दिवस  बाहेर जाऊन रोजच्या रुटीन मध्ये  बदल  करून पुन्हा रुटीन आयुष्य जगण्याने ताजे तवाने  होतो . त्या बदलात  निवांतता आपण मिळवू शकतो.
     ह्या निवांताची गरज पशु पक्षामध्ये  पण पहावयास मिळते . पक्षी  आकाशात मजेत विहार करतांना , मजेत दाणे  टिपतांना दिसतात . चिमण्या  अथवा इतर पक्षी मातीत वा पाण्यात पंखांची फडफड करतांना दिसतात. गुरे नाही का झाडांचा आडोसा शोधून निवांतात रवंथ करतांना आढळतात . ते पण निवांतपणा  मिळवतातच ना ! इतकेच काय सृष्टी कडे पहा.सूर्य दिवस भर प्रकाशमान होऊन  संध्याकाळी  आपल्या  तत्प किरणांना शमवून सृष्टिच्या  कुशीत, डोंगराच्या आड , सागर काठी अस्ताला जातो. जणू काही तो पण निवांतता  मिळवू पाहतो. वनस्पतींची पाने पण मिटतात .  संध्याकाळी  पक्षी पाखरे  आपल्या कोटरा कडे कडे गुरे आपल्या निवा-याकडे धाव घेतात .
     शालेय जीवनातील W.H.Divies यांची कविता आठवते.  
       what is this life full of care
      we have no time to stand and stare .
    आयुष्य नुसते  चिंता काळजी मन:स्तापाने  भरलेले असेल , तर त्या जीवनाचा काय अर्थ? आपल्या आजूबाजूच्या   सृष्टीत , निसर्गात,  नव- नवीन ऋतु प्रमाणे होणारे बदल पहावयास हवेत . आपल्या भोवतालची  झाडे, वेलीत ऋतूप्रमाणे होणारे बदल ,वसंतातील बहरणारी   झाडे, त्या पानांचा बदलणारा हिरवा पोपटी रंग , सूर्योदयाच्या व सूर्यास्ताच्या वेळी आकाशातील बदलते रंग , वर्षा  ऋतूतील ढगांनी भरलेले आकाश  व त्या ढगांचे बदलते आकार ,तळ्याच्या पाण्यात उठणारे तरंग ,फेसाळलेला समुद्र ,हे सारे पहावयास हवे नुसते भरधाव  गतीने जगणे हे जीवन जगणे नव्हे .म्हणूनच W.H.Divies
     A poor life this if ,full of care
    we  have no time to stand and stare
        तेव्हा निवांतपणा ,फुरसत मिळ्त  नसते .तर  तो मिळवावा लागतो .व हा निवांतपणा मिळाला की माणसाची  मानसिक  तृष्णा   शमते  व   मनास  नवीन  उभारी  , हुशारी मिळते.




विषय - क्षणभर थांब 

     *निवांत*
किती पळशील
 सदा जीवनात
क्षणभर थांब
जरा निवांतात      1

बघ उगवता
सूर्य  गगनात
निहाळ तयाच्या
प्रभा आनंदात       2

पहा झुळुझुळु
वाहे तो निर्झर
 निनाद ऐकण्या
थांब   क्षणभर      3

सांजवेळी बघ
नभातील पक्षी
किती मनोहर
दिसतेय नक्षी        4

येता रवी  नभी 
कळ्या अलवार
फुलूनी डौलती
 फुले  हळुवार       5

बघ ही किमया
पहा  खरोखर 
क्षणभर थांब
आहे मनोहर          6
 

वैशाली वर्तक

बुधवार, २० जुलै, २०१६

नाती शृंखला

                                                           नाती शृंखला   
 मी माहेरी आले होते .मैत्रिणींना भेटणे वगैरे झाल्यावर एक दिवशी जुन्या कपाटा-कडे गेले. जेथे माझ्या जुन्या वस्तू ठेवल्या होत्या . त्या कपाटात हुसका हुसकी करता  एक डबा मिळाला .ज्यात चिमुकला संसार लिहिलेला खोका होता. मी लगेच तो उघडला . तर त्यात माझी बालपणीची खेळ बोळकी मिळालीत. मी अधीरतेने सर्व खेळणी बाहेर काढून त्यावरून हात फिरवू लागले.  तो तवा ,तो कुकर , चिमटा ,शेगडी सर्व तसेच होते. त्यावरून हात फिरविता फिरवता  मला बालपण डोळ्या समोर आले . त्या खेळा  बरोबर मी दिवसाचे किती तरी तासन तास खेळले होते. माझी मामे बहीण  स्नेहा पण यावयाची. आम्ही  दोघी मिळून आईच्या साड्या नेसून ,  नेसून कसल्या गुंडाळून खेळायचो.  मग मी आईच्या भूमिकेत  शिरावयाची व आई ज्या प्रमाणे बोलते  तिच्याच पध्द्तीने , आटपा लवकर  मला ऑफिसला जावयास उशीर होत आहे, किती कामे बाकी आहेत वगैरे तिची वाक्ये बोलायची . आज आता आम्ही दोघी आपापल्या संसारात रमलो आहोत .
       खरच, आई माझ्या साठी किती करावयाची, सतत  आमच्या मागे पुढे असावयाची . आई शिवाय क्षणभर पण करमायचे  नाही . लहान पणी मी, तशी म्हणे रडकीच होते. आई जरा दिसली नाही तर झाले.  संपले. रडून गोंधळ  घालायची. सर्व जण मला आईचे शेपूट म्हणून चिडवावयाचे . कित्येकदा तर आई पोळ्या करताना मला तिच्या जवळ दुपट्ट्याने बांधून ठेवावयाची . पुढे मला भाऊ पण झाला . बहीण- भाऊ या नवीन नात्यात बांधले गेले . त्याच्या बरोबर खेळण्यात, मस्ती करण्यात , भांडण्यात वेळ जावयाचा . आमच्या शेजारीच आमची आत्या रहावयाची . आई ऑफिसला जातांना शेजारच्या मावशींकडे आम्हास ठेवायची . पुढे शाळेतून आल्यावर आम्ही त्या मावशीं  कडे खेळावयाचो. व.  आई येताच तिला बिलगावयाचो  .
         हळू हळू मी व भाऊ मोठे झालो. मोठे होताना आई बाबा , आत्या , शेजारच्या मावशी  याशिवाय  आमचे पण वेगळे मित्र मैत्रिणींच्या नात्याचे   नवे वर्तुळ तयार होत गेले . मनुष्य जन्मास येतो त्याला तीन जणांचे ऋण असते . पाहिले आई बाबा तसेच नातेवाईक जे त्याच्या आगमनाची वाट पाहत असतात व समाज ज्यात आपण वावरतो, मोठे होतो. तेव्हा माझे पण तसेच झाले. या नात्याच्या गोतावळ्यात अडकत गेले. पुढे शालेय , महाविद्यालयाचे शिक्षण संपवून मी  नवीन नात्यात , संसारात गुरफटले . त्यामुळे अजून नवीन नात्याचे अनेक पदर वाढत गेले . पती, सासू- सासरे, दीर, नंणद, जाऊ, भाचे अशी अनेक   नात्यांची गुंफण वाढत गेली. व लहानपणी भातुकली खेळणारी मी ,ख-या आई व मुलीच्या नात्यात पदार्पण  करती  झाले .  तासन तास घर घर खेळणारी आता प्रत्यक्षात आईच्या भूमिकेत येऊन ठेपले. गोंडस मुलीची आई झाले. तेव्हा मला  तीव्रतेने आईची आठवण झाली. आई म्हणते, त्या प्रमाणे तिने किती रात्र रात्र माझ्या साठी  जागून  काढल्या असतील , मोठे करताना तिला किती कष्ट झाले असतील याची जाणीव झाली. प्रत्येक आई आपल्या पाल्यांवर जिवापार प्रेम करतेच . तसेच माझे झाले आहे. . मला पण दोन गोंडस मुली झाल्यात . त्यांना गोंजारण्या . मोठे करण्यात , वाढविण्यात, त्यांच्यावर उत्तम संस्कार करण्यात दिवस जात आहेत . जे काही आपल्यास  नाही मिळाले ते सर्व मुलींना मिळावे यात मी लक्ष देत आहे. कधी तरी एखाद गोष्टींकडे लक्ष देण्यात कमी पण पडते.  कारण नौकरी करून घरदार, पै- पाहुणे,येणारे - जाणारे , सर्व पहात संसार सांभाळणे , म्हणजे तारेवरची कसरत असते, पण माझा जोडीदार माझा सखा  'पती' या   दृढ नात्याची  मला योग्य व सतत साथ करतो. तसेच माझे आई- बाबा, व त्याच प्रमाणे सासू- सासरे यांची फार फार मदत होते. सासूबाई तर अति उत्साहाने  माझ्या मुलींना अवांतर शिक्षण देण्यात  दंग असतात. त्यामुळे मी या सर्व नात्यांच्या  शृखंलेत अडकून  आनंद उपभोगते  आहे,अनुभवते आहे. आता मोठी मुलगी पण समंजस झाली आहे . ती पण धाकटीला छान सांभाळते. काळजी घेते. लहान असताना तर माझ्याच प्रमाणे ती लहान बहिणीस थोपटवून अंगाई गीत गाऊन झोपवावयाची. तिचे ते छाया- चित्रण मी जपून ठेवले आहे व बरेचदा  ती  चित्र फीत   मी  पहाते.
             सुरुवातीस या सिंगापुरात आल्यावर ,कोणी ओळखीचे नव्हते पण महाराष्ट्र मंडळात येऊन मला अनेक मैत्रिणी मिळाल्या  व मैत्रीचे नाते वाढत गेले. अजून  आमचे नाते गुंफण चालूच आहे व  यातून आनंद मिळविणे हेच खरे जीवन  आहे ना  !    

शनिवार, ११ जून, २०१६

थंड पाण्याचा ग्लास

                                   
                                                                  ** थंड पाण्याचा ग्लास**    

              मार्च महिन्याची ३१ तारीख होती .  उन्हाने  जीव घाबराघुबरा  होत होता . मी बँकेत आले. खुर्ची सरसावून शांत खूर्चीत बसले . एसी च्या  गारव्याने मन संतोषले . जरा हु ssश झाले. आज  नोकरीचा शेवटचा दिवस होता. म्हणजे रिटायरमेंटचा दिवस होता .
      " हं ,पाणी घ्या ताई "म्हणत हिराबाई पाण्याचा ग्लास धरून उभ्या होत्या . क्षणभर मी त्या ग्लासकडे पहातअसता, मला बँकेत रुजू झाल्याचा  पहिला दिवस आठविला . जेव्हा मी  तोंडी ,लेखी सर्व परीक्षा  पार  करून नियुक्तीचे पत्र घेण्यासाठी   बसले होते.
      माझ्या नावाचे  उच्चारण करत चपराशी आला . व म्हणाला," तुम्हाला कॅबीन मध्ये बोलविले आहे".
मी उठून आत गेले.
    आत गेल्यावर  म्यानेजर जर साहेबांनी बसावयास सांगितले
मँनेजर साहेब म्हणाले ," अभिनंदन. हे घ्या तुमचे नियुक्ती पत्र"
  त्यांनी अपॉइंटमेंट लेटर दिले . चपराशाने पाण्याचा ग्लास पुढे केला . त्या पहिल्या ग्लास  पासून ते  हा आजचा ग्लास मी SBI चे नियमित पाणी पीत होते. काय योगायोग पहा ! पहिला व आजचा शेवटच्या दिवशीचा थंड पाण्याचा ग्लास .. या दोन्ही  ग्लासांनी मला  बालपणाच्या आठवणीत ओढून नेले.

          क्षणात  शालेय जीवन डोळ्यासमोर उभे झाले . शाळेत असतांना त्यावेळी आमच्या शाळेत, रीसेस मध्ये पाणी पिण्यास रांगेत उभे राहून, क्रमाने पाणी प्यायला मिळायचे. . पाणी वाल्या ताराबाई प्रत्येकास पाणी प्यायला द्यावयाच्या.  हो......त्यावेळी हल्ली सारखे वॉटर बॉटल घेवून जाणे फार प्रचलित नव्हते .
      सकाळी  ते संध्याकाळी ५ ची शाळा असावयाची . दोन लहान सुट्ट्या व एक मोठी डबा खाण्याची सुट्टी . माझे घर तर शाळेच्या अगदी जवळ होते. इतके जवळ कीं  धावत जाऊन दोन मिनिटात पाणी पिऊन परत वर्गात येवू शकायची . मोठ्या डबा-खाण्याच्या सुट्टीत  तर, मी  घरी जायची,  आजीने पाट मांडलेला  असावयाचा खाऊ खाऊन परत  शाळेत यावयाची .
     खाऊ खाल्ला की आजी म्हणायची," हं , हे घे पाणी पी. आणि आजीने माठाला स्वच्छ ओले  कापड गुंडाळून, त्यावर सतत पाण्याची धार सोडून , ती कापड ओले ठेवावयाची, की जेणे योगे... पाणी माठात थंड राहील . कधी कधी पाण्यात ती वाळा पण टाकावयाची .त्यामुळे मंद सुगंधी पाणी पिण्यास मिळायचे.  माझ्या मैत्रीणी पण रीसेस मध्ये माझ्या  घरी पाणी पिण्यास यावयाच्या .
         असे सर्व असता आमच्या वर्गात एक जोशी नावाची मैत्रीण होती .तिचे वडील शाळेच्या जवळ पास असलेल्या बँकेत सर्वीस ला होते. ती पण त्या दिवशी माझ्या घरी पाणी पिण्यास आली होती . आम्ही मैत्रिणी माझ्या घरून पाणी पिऊन शाळेत परत जात होतो.
  ती सहज म्हणाली," मी आज आले तुझ्या कडे पाणी पिण्यास , पण माहित आहे का?. मी तर नेहमी माझ्या वडिलांकडे जाऊन पाणी पिऊन येते. वडिलांकडे म्हणजे कुठे माहित आहे का ? माझ्या बाबांच्या बँकेत .
 मी माझ्या बाबांकडे जाते .  मग ते चपराशास सांगून ,त्याचे करवी मला पाणी देतात.
  तो थंड पाणी आणून देतो. आणि काय सांगू ?..आत वातावरण वाळ्याच्या ताट्यानी कसे थंड असते. "
असे वर्णन करुन तिने सांगितलं .
 पुढे म्हणाली, " ए,ऐक ना, तुला यावयाचे आहे का ? माझ्या बाबांच्या बँकेत थंड पाणी पिण्यास ?
 मी तिला खुशीने हो ssओ   म्हणत ,मानेने होकार दिला .
  मग  ती ऐटीत ,आणि ठसक्यात म्हणाली ,"जाऊ  या तर, आपण माझ्या बाबांच्या बँकेत पाणी  पिण्यास ."
 मला पण मजा वाटली .
 ती पुढे थांबली, व म्हणाली," पण,...तुला एक काम करावे लागेल . "
 मी सहजतेने विचारले,"काय ग?"
 त्यावर ती म्हणाली, जेव्हा केव्हा माझा गृहपाठ बाकी राहिला असतो ना ,त्या दिवशी तू पूर्ण करून देण्यास मला मदत करायची. थोडे लवकर तर ,आपण शाळेत येतोच की .!  तेव्हा तू थोडा करावयाचा." .
मी लगेच म्हटले ," एवढेच ना ? करीन कीं त्यात काय मोठे ?"
तिचे घर   शाळे पासून बरेच लांब होते. त्यामुळे तिचा गृहपाठ बरेचदा बाकी रहावयाचा . काय करणार खेळण्यात अभ्यास राहू जायचा. शाळेत तर वेळेवर आले पाहिजे. ... पण मग आमचे ठरल्या प्रमाणे मी तिला नेहमी गृहपाठ पूर्ण करण्यात मदत करावयाची . आणि तिच्या बरोबर रीसेस मध्ये तिच्या बाबांच्या बँकेत पाणी पिण्यास जावयाची .
       काय मजा वाटायची  त्यावेळी . तिच्या बाबांच्या बँकेत जावयाचो . बँकेत दारात शिपाई उभा असावयाचा . तेव्हा कुठे माहित होते त्याला वॉचमन म्हणतात. त्याला ती तिच्या बाबांचे नांव सांगावयाची. बरेचदा ती जात असल्याने तो आता तिच्या ओळखीचा वा तो तिला ओळखू लागला होता. आम्ही तिच्या बाबांच्या टेबलापाशी जायचो . आम्हाला पाहून तिचे बाबा चपराशाला बोलवून सांगावयाचे कीं ," ये बच्चीयोंको  पाणी दे ना जरा."
. मग तो पितळी स्टान्ड मधे स्टीलच्या ग्लासात थंड पाणी घेऊन यावयाचा . तो पाणी घेऊन येई स्तोवर मी आजूबाजूलाच्या टेबलखुर्च्या , त्यावर काम करणारे लोक , हे पहात रहायची. पाहून मजा वाटायची सारे कसे खाली मान घालून काम करत असायचे .काही ठिकाणी टेबलाशी , खिडकीशी (तेव्हा त्याला काउंटर म्हणतात) हे पण माहित नव्हते. त्या काउंटरशी रांग असायची. हे सारे पहात, आतील थंड वातावरणाचे सुख अनुभवत उभी रहायची. बँकेची ही मजा अनुभवायला मजा वाटायची.
  असे आमचे त्या वर्षात अधून मधून चालले होते. पुढे  त्या मैत्रिणीच्या वडिलांची बदली झाली असावी आणि मी पण पुढे तिला बालपणात विसरले . मी पण तेव्हा फार तर 4/5 यत्तेत असेन त्यावेळी.
         पुढे मी माझे प्राथमिक शिक्षण , हायस्कूल चे तसेच महाविद्यालयाचे शिक्षणपूर्ण केले. पदवीधर   बी कॉम झाले. नोकरीसाठी अर्ज करत  होते . अर्ज करीत असता योगायोगाने  त्याच बँकेत पुढे नोकरीस लागले . जेव्हा मैत्रीणी   बरोबर थंड पाणी पिण्याच्या आशेने व बँकेच्या कुतुहलाने
 पाणी पिण्यास येत होते. आणि .....त्यासाठी तिचा होमवर्क करुन देत होते.. तेव्हा, कधी तरी वाटले होते का ? कीं  पुढे त्याच SBI  चे  मी ३१/३२ वर्षे पाणी पिणार होते म्हणून .
         मी मनात पाण्याच्या ग्लासाकडे पहात योगायोग वर हसले . आणि हिराबाईंने दिलेला थंड पाण्याचा ग्लास हाती घेतला व संतृप्त मनाने पाणी प्यायले.

  वैशाली वर्तक 















शनिवार, १४ मे, २०१६

kautukकौतुक

                                                                  कौतुक
                         सर्वांना आवडे सोहळा कौतुकाचा,
                         लहानास काय मोठ्यांना पण
                         वाटे हवा-हवासा .
                         पडता  पहिले पाऊल बालकाचे
                         असंख्य छायाचित्रे
                         घेतली जातसे.
                        अन  बोलता बोल बोबडे
                        ध्वनी अंकित होतात बोल तयाचे.
                        कौतुक करून घेणे कोणास न आवडे
                        अहो ! एवढेच काय  ,
                        देवास पण हवीच कीं हो
                       स्तुती स्तवने.
                       वाढ -दिवस असो
                       वा मंगल-कार्ये,
                       ती तर असती कौतुकाचे सोहळे
                       सध्याचे युग तर, निव्वळ कौतुकाचे,
                       पदो-पदी कौतुकच कौतुक नाचे
                      कौतुक-कौतुक पण, किती करावे?
                      स्व:ताच्या व्यक्तीचे  प्रेम पण
                      कौतुकाने  फेस बुक वर दाखवायचे.
                      अन किती लाईकस मिळाले ते पहायचे.
                      व्हॉंट- अप काय,
                      फेस बुक काय,
                      मनांत इच्छा असो वा नसो
                     लाईकस कौतुकाचा मिळणारच  देणारच तयास.
                     करता खाद्य पदार्थ नवा घरात
                     पहिले प्रसारित होतो व्हॉंट- अप वर खास
                     नैवेद्या सारखा चित्रित करून
                    मगच मिळतो
                    चवीस इतरांस
                    सोशिअल मिडीयाने
                    स्थान दिले कौतुकाला
                    कौतुक सोहळा अतीच फोफावला.
                    
                      
                     

बुधवार, ४ मे, २०१६

मान

                                     मान
वदनास  वाटे  माझ्यानेच,
मोजमाप  होते सौंदर्याचे.
पण नको करुस , गर्व वदना,
तव रूप  दावविण्यास  ,
आस्तिव हवे माझेच, ताठ मानेचे.
असती माझ्या नाना त-हा ,
कधी उंच सुरई  समान, 
तर कधी बाकदार ,
जशी शोभे राजहंसास 
हो, करिते मी  चाळे लाडिक ,
अन करिते, घायाळ जनास
देता हलकेच लाडिक झटका ,
होतात फिदा  आशिक क्षणात .
विचारांशी होता सहमत ,
मीच दाविते होकार निदर्शन
नकार दर्शविण्या-सुध्दा
करिते मी नन्हाचे प्रदर्शन .
मिळता  गौरव अथवा यश ,
मीच असते मला  उंचावून ,
पण, जरा पडता पाऊल चुकीचे ,,
मजला मीच, तुकविते लाजून .
जवाहिर तांना पण   माझाच  छंद ,
मम छायाचित्रे घेतात टिपून              
शोभा तयांच्या , आभूषणांची
करण्यास मीच असते तत्पर.
ठेविता  मान  इतरांचा , मान मिळे  स्वतःला ,
हाच गुरु मंत्र ठेवून घ्याना
आदराने द्यावा मान थोरांना. 
अन हेच रहस्य जीवनाचे,
ठेविते मी  सदा माझ्या  मनात

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...