शुक्रवार, १७ जानेवारी, २०२५
सरत्या वर्षाने काय दिले
बुधवार, १५ जानेवारी, २०२५
आठवणीच्या गावामध्ये
सिद्ध साहित्यिक समूह
आयोजित उपक्रम क्रमांक ५७०
मुक्तछंद काव्य प्रकार
विषय. आठवणीच्या गावामध्ये
शीर्षक.. ताज्या झाल्या आठवणी
जुनी जुनी छायाचित्रे
पहात होतो बसलेलो
गेले आठवांच्या गावी
भान वेळेचे नुरले
आठवणीच्या गावात
गेले क्षणात रमून
कसे होतो ना आपण!
हसू आले आता स्मरून
रम्य जुन्या दिवसांची
झाली मज आठवण
जेथे प्रथम भेटलो आपण
केली मनी साठवण
किती केलेस नखरे
कधी नसे तू वेळेवर
मात्र मी असे उभाची
तुझ्या भावा बरोबर.
हात तुझा माझ्या हाती
दिली घेतली वचने जोडीने
भासली हसलेली सुमने
पाहुनीया त्या प्रीतीने
छाया चित्र सांगे कानी
कसे होईल विस्मरण
तुझ्या माझ्या मनातली
राहील सदा आठवण
बाहेर आलो आठवणीतून
तृप्त समाधानी मनाने
उन्हात पण चांदणे हसले
देवाजीच्या कृपाप्रसादाने
वैशाली वर्तक
अहमदाबाद
मंगळवार, १४ जानेवारी, २०२५
चित्र काव्य
पहा कसा वाजवितो
गोकुळीचा तो मुरारी
कानी येताच स्वर ते
राधा होतसे बावरी
काय जादु होती जाणे
पावा वाजविता कान्हा
पक्षी प्राणी विसरती
गाईंनाही येई पान्हा
जल यमुनेचे पण
क्षणभर वाही मंद
सारा आसमंत वाटे
भरलेला जणु आनंद
मंत्र मुग्ध आसमंत
करितसे नंदलाला
काय महिमा मुरलीचा
वेड लावी गोकुळाला
मकर संक्रांत
शुक्रवार, १० जानेवारी, २०२५
आई अभंग मातृदिन. ...आई
माझी लेखणी साहित्य मंच, शहापूर जि
ठाणे आयोजित मोठा अभंग लेखन
कार्यशाळा
विषय .. मातृदिन
शीर्षक.....महिमा मातेचा
धरूनीया बोट |पहिले पाऊल |
लागते चाहूल. | जीवनाची ||
असे जरी स्वामी | तिन्ही ही जगाचा |
तो कष्टी मनाचा. | आई विना ||
होता जीवा कधी |दुखापत कदा |
ओठावरी. सदा | शब्द आई ||
घटाकार देई | घटास आकार |
देतसे संस्कार| बालकास||
मिळे स्वर्ग सुख | तिच्याच कुशीत |
मुलांना खुशीत |सदा ठेवी ||
आई किती वर्णू | तव गुण गाथा |
नमविते माथा | सांगे वैशू ||
...........वैशाली वर्तक
अहमदाबाद
मंगळवार, ७ जानेवारी, २०२५
कर्म रेषा बोलत आहे
सोमवार, ६ जानेवारी, २०२५
हाताच्या रेषा
गुरुवार, २ जानेवारी, २०२५
बाराक्षरी स्मरण..नवीन उभारी \
नाम घ्यावे सदा ,मुखी राघवाचे
करितो सार्थक ,तोची जीवनाचे
लावा तया नामे,अंतरीचा दिवा
क्षालन करण्या, वाईट कर्माचे
भुरळ पाडे ती , षडरिपू जिवा
मनन चिंतन ,करा ईश्वराचे १
बळे बळें चित्त कोठेची रमेना
नामस्मरणात सुख ते मिळाले
उठता मनीं वादळ विचारांचे
मन समाधाने प्रसन्न जहाले. २
मार्गची दिसेना, जीवन तरण्या
मन अडकता , संसार सागरी
विचार छळती सदैव संसारी
कशा मिळतील ,सुखाच्या घागरी
तोची जगी असे, कर्ता करविता
लाभावे भाग्यची ,मज दर्शनाचे
शरणची आले, तुज भगवंता
उजळेल मम ,भाग्य जीवनाचे
स्पर्धेसाठी
मोरणा कार्यशाळा चौकट बद्ध बाराक्षरी उपकाव्य प्रकार
स्पर्धा क्रमांक 1
दि 12/1/24
विषय ... नवीन उभारी
शिर्षक. जीवनी भरारी
उंच नभातला पाहूनी पतंग
मनी देत असे सदैव उमंग
इच्छाशक्ती हवी, मनात यशाची
जीवाला देतसे *नवीन उभारी*
उंच उडणा-या पतंगा सारखे.
पंख पसरूनी घेऊया भरारी
चढाव उतार , येणार जीवनी
सुखाची अपेक्षा नको सदोदित
मन लावुनिया करिता प्रयत्न
उज्वल यश येणारच खचित
वैशाली वर्तक
अहमदाबाद
सरत्या वर्षाने काय दिले
स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित झटपट काव्यलेखन स्पर्धा विषय सरत्या वर्षाने काय दिले विचार करता मनी काय मिळाले गत वर्षात दिले सुख आनं...
-
काव्य स्पंदन राज्य स्तरीय समूह 02 काव्य प्रकार -- अष्टाक्षरी 1 विषय -- उंच भरारी आकाशी आहे तुझ्यात कर्तृत्व घेण्या नभात भरारी दाव सामर...
-
सर्व धर्म समभाव लोकशाही साहित्य मंच आयोजित उपक्रम 348 विषय. नारळ कल्पवृक्ष स्थान फळांत मानाचे असे सदा नारळाला श्री उपपद लावून वदती ...
-
इथं इध बस ग चिऊ दाणा खा पाणी पी अन् बाळाच्या डोक्यावरून भुर्रsssकन उडून जा. असे म्हणत विभावरी बाळाला खेळवत होती. ...