देवाने मानवाला विचार करण्यास आणि त्या प्रमाणे वागण्यास मेंदू दिला आहे.ऐवढेच नव्हे तर वाच्यता करण्याची अद्भूत शक्ती दिलीआहे . त्यामुळे मानव काय हवे नको ते वा त्याचे विचार तो वाणीने संवादातून...वाच्यतेतून सांगू शकतो. .. विचार प्रगट करू शकतो. त्याच्या विचारांचे मंथन करून
एकमेकांत विचारांची देवाण-घेवाण करुन विषयाला पूर्णत्व देऊ शकतो.
पण प्राण्यांचे तसे नाही. प्राण्यांना आपल्या सारखी वाच्यता करता येत नाही. पण, प्रेम भावना तयांच्यात पण झरत असते.
गाई अथवा सारे प्राणी त्यांच्या हालचाली तून प्रेम व्यक्त करत असतात.ठराविक वेळेनुसार गाय पिल्लाला चाटून मनुष्यप्राणी जसे बाळास कुरवाळतात ना तसे गाई पिल्लांना प्रेम करतात. पिल्लास माया करतात.
गोरज मुहूर्तावर म्हणजे राना वनातून चरून जेव्हा गुराखी घराकडे परततो तेव्हा गाय हंबरुन परतण्याची वेळ झाली हे पिलास सांगत असते. हे तिचे हंबरणे म्हणजे काळजी करण्याचे वा काळजी करण्याची पावती असते वा गाईंची पिल्लांशी सांकेतिक भाषा आहे .
माता असो, मानवाची वा प्राण्यांची .... ती प्रेम करतेच. काळजी घेते, निगा घेते. जोवर पंखात बळ येत नाही तोवर काळजी घेतेच , उगाच का म्हणतात, "घार उडे उंच आकाशी पण लक्ष तिचे असे पिल्लांशी".
तसेच गाईचे असते. तिचे हंबरते वासराला कळते. हंबरणे ऐकून वासरू धावत गाई माये जवळ येते. तिची वासराला साद कळते. जेव्हा गाय व्याते , पिलास जन्म देते. जन्म दिल्यानंतर त्याला चाटून साफ करते. हंबरते.प्रेम व्यक्त करते.
तेच प्रेम माणसात आपण पहातोच. आई बाळाचे प्रेम .मातेच्या प्रेमावर तर लिहावयास बसता
काव्य खंड तयार होतील.आईचे बालका प्रति प्रेम म्हणजे काळजाच्या तुकड्यासमान. यशोदा कन्हैया चे
राम कौसल्येचे प्रेम अजरामर आहेच
आई मातीच्या गोळ्याला आकार द्यावा तसे संस्कार करून बालकांचे उज्वल भवितव्य घडव�
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा