बुधवार, २३ सप्टेंबर, २०१५

लेख संकेत



                                                                संकेत
                महाभारतात जरासंघ बरोबर भीमाचे मल्ल युद्ध् आरंभिले  असता , श्री कृष्णाने , भीमाचा विजय  घडविण्यासाठी  दोन काडया  परस्पर विरुद्ध  दिशेला टाकून संकेताने दर्शविले की  , हे असे कर, तरच तुझा विजय शक्य आहे . नाहीतर जरासंघाच्या समोर भीमाचा विजय शक्य नव्हता . जरासंघाची  बलाढ्यता लक्षात घेऊनच, श्री कृष्णाने चालाखीने भिमास संकेत दिला होता . इतकेच काय ! दुर्योधना बरोबर गदा-युद्धात पण  स्वत:च्या जांघेवर थाप मारून भिमास दुर्योधनाची नाजूक जागा  दर्शविली . व भीमाचा विजय घडवून आणविला . तेव्हा संकेत हे महाभारता  पासून चालत आले आहेत . खाणा खुणा  करून, संकेताने भावना पोहचविणे , संदेश देणे , चालत आले आहे .शब्दाचा उच्चार न करता खुणेने वा  , इशा-याने विचार मांडणे , व आपले बोल दुस-यास पोहचविण्याचे माध्यम म्हणजे संकेत होय .
             प्रणयात तर काय संकेताचेच काम चालते . नुसत्या डोळ्यांच्या इशाराने प्रेमी प्रेमिकांचे शब्दांचे देवाणघेवाण होते. म्हणूनच  तर कवी त्यांच्या कल्पनेतून म्हणतात  ना ,'' शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या  पली कडले .'' ते काय  उगीचच  नव्हे. आणि डोळे हे तर संकेताचा मोठा अथवा मुख्य धागा आहे. नुसत्या  डोळ्यांच्या इशाराने , तिरपे कटाक्षाने ,नजरेच्या खेळातून  आवाज वा शब्द  न उच्चारता संकेत खूप सारे बोलून जातात . त्यांनी एकमेकांच्या डोळ्यात डोकावून पाहिले . तिच्या डोळ्यातून तिची आर्त भावना कळली वगैरे . तेव्हा  संकेतात  डोळे  फार मोठे काम करतात. म्हणूनच तर कवींच्या   पण '' डोळे हे जुलमी गडे रोकून मज पाहू नका , वा नको विसरू संकेत मिलनाचा , वा  तिरपा कटाक्ष  भोळा आम्ही  इथे दिवाणे वगैरे काव्यातून संकेताचे महत्व काय ते  कळते .
          बालपणात पण आई अथवा  माता मुल रडले की  त्यास भूक लागली असेल असे समजते . म्हणजे जेव्हा   शब्द नसतात तेव्हा हे संकेत संभाषणाचे  काम करतात . लहान मुले पण खेळतांना खुणा करून इशाराने , व हातवारे करून भावना पोहचवितात . पत्ते खेळतांना कुठले पान  बदाम वा किलवर खुणे ने दर्शवितात .  तसेच खेळतांना मी तुझ्याशी बोलत नाही आहे, हे   न शब्द उच्चारता करांगुलीच्या   इशाराने दाखवितात इतकेच  काय ! मुले आई बाबांच्या डोळ्याच्या इशाराने धाकात रहातात . तो पण संकेताचाच प्रकार आहे.
     तसेच डम शो  मध्ये तर सबंध गाण्याची ओळ वा  सिनेमाचे नाव ,  काही खाणा  खुणांनी शब्द न बोलता इतके च नाहीतर ओठांची पण हालचाल न करता, हातवारे करून संकेतातून ओळखण्यात  येते.  आदेश भावजी " होम मिनिस्टर " मध्ये नेहमी संकेत  खेळाची   स्पर्धा घेत असतात.
       मूक बहिरे लोकांच्यात  तर ह्या संकेतांचाच खेळ असतो . अंध जनांची जशी  स्पर्शाची ब्रेल लिपी, तशी मूकबहिरे लोकांची संकेताची , इशाराची सांकेतिक भाषा असते, ज्यातून शब्दांची देवाण -घेवाण  होते . टेलिव्हिजन वर आपण पहातो शब्द न उच्चारता , जगातील सर्व घडामोडी नुसत्या संकेतांनी  दाखवून बातम्या मूक  बहि-यांना समजतात . व जगाच्या संपर्कात राहून जगाशी  जोडलेले  राहू  शकतात .
      तसेच प्राण्यात , पशु पक्ष्यात पण संकेत असतात. मोर का उगाच लांढोरा समोर आपला पिसारा फुलवून नाचतो .  व आकर्षित करतो . तर कबुतर शरीर फुलवून त्याचे प्रणयाचे  संकेत  समोरच्यास देते. तसेच ह्या  प्राणी पक्ष्यानच्या  हालचालीतून आपणास हवामानात काय बदल घडणार ह्याचे संकेत मिळतात . जसे आकाशातील काळे ढग पाहून मोराचे नाचणे पाहून आता पाऊस येणार याचा संकेत मिळतो . तसेच मालकाशी  सतत इमानदार असणारा कुत्रा, घराच्या सुरक्षितेत बाधा येत असेल अथवा कोणी अपरिचित माणूस वा व्यक्ति घराशी आली तर भुंकून  इशाराने व  त्याच्या भुंकण्याच्या संकेताने मूक जनावर असून पण भावना  मालकास पोहचविते.
        जेव्हा भाषा नव्हती तेव्हा सांकेतिक चिन्हांनी वा चित्र लिपीतून  काम होत असे. अजून पण बाई चे चित्र लावून महिला  कक्ष दर्शविले जातेच ना . इतकेच काय रहदारीत सुरक्षिता नीट  ठेवण्यात सांकेतिक चिन्हे उपयुक्त ठरतात. जसे शाळा जवळ असेल तर दप्तर घेतलेला मुलगा/ मुलगी दाखवून  वा रेल्वे क्रोसिंग  पुढे आहे चित्राने दाखवितात. तसेच येथे वहाने वळविणे चुकीचे आहे अथवा रस्त्यावर पांढरे पट्टे काढून , येथून रस्ता ओलांडावा .वगैरे सांकेतिक चिन्हाच्या उपयोगाने रहदारीची खबरदारी ठेवली जाते . महा मार्गावर तर काटे /चमच्याचे चित्र दर्शवून  उपहारगृह जवळ पास  आहे .तसेच  पार्सल मध्ये  कुठली बाजू वर असावी हे पण उभे वर दर्शविणारे बाण काढून तसेच  इतर चिन्हे दाखून माल सामानाची सुरक्षिता ठेवण्यात ,  खबरदारी घेण्यात सांकेतिक चिन्हे उपयोगी पडतात .
   आता , मोबाईल  युगात तर रोज अहोरात्र दुखी, हसरा, आनंदी,वगैरे  चेहेरे व इतर बरीच  संकेतिक चिन्हे काम करत असतात . व संभाषण साध्य होत असते थोडक्यात संकेत हे  विचारांचे  देवाण घेवाण करण्याचे महत्वाचे माध्यम  आहे.

















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...