भेळ
भगिनी समाजाच्या आनंद मेळ्यास गेलो होतो.बरेच खाद्य पदार्थांची छोटी दुकाने लावलेली होती.
.पण"मुंबई भेळ " या दुकानावर गर्दी अमाप होती .भेळेचाच स्टोल,गर्दी असणारच. भेळ म्हटली की
पोटभर जेवल्यावर पण एखादी भेळेची डीश शेअर करावयास हरकत नसते.कारण भेळ पदार्थच
अतिशयरुचकर ना ! तोंडाला नुसती चवच नाही पण भूक पण चाळवणारा पदार्थ .खरेच चुरमुरे कुरमुरे
त्यातवाफवून कुसकरलेले बटाटे, बारीक चिरलेला टोमेटो ,मैद्याच्या पुरीचे चुरलेले तुकडे ,मीठ ,फरसाण, त्यात चिंचेच्या आंबट गोड चटणीने , मिरची कोथिंबीर पुदिन्याच्या हिरव्या तिखट
चटणीच्या पाण्याने सर्व पदार्थाचे नीट मिश्रण करून वर बारीक चिरलेला कांदा, बारीक शेव, बारीक चिरलेली कोथिंबीर व त्यात लाल चुटूक अनारचे (डाळिंबाचे) दाणे,काय शोभिवंत दिसते ना भेळ ! नुसते वर्णन ऐकूनच तोंडास पाणी सुटले ना ?
भेळ म्हणजे तरी काय ? मिश्रण.निवडक खाद्य पदार्थांचे योग्य प्रमाणात मिश्रण म्हणजे भेळ.
तसे पहिले तर स्वयंपाक कृतीत अनेक पदार्थांचे मिश्रणच असते .व त्या योग्य मिश्रणाने पदार्थ तयार होतो. सर्वच खाद्य पदार्थ,पदार्थांचे मिश्रण करून म्हणा अथवा भेळ करून म्हणा तयार होतात .त्याच खाद्य पदार्थास अनेक मसाल्याच्या पदार्थांची भेळ करून म्हणजे लवंग, तमालपत्र ,दालचिनी वगैरे मसाल्यांचे एकत्रीकरण करून वा मसाल्याच्या जिन्नसांची भेळ करून खाद्य पदार्थांची रसना ,चव वाढविण्याचे काम , ही मसाल्याच्या जिन्नसांची भेळच करते.
एवढेच काय भौतिक शास्त्रात पहा, धातूंच्या मिश्रणाने म्हणजे, दोन अथवा अधिक धातुंचे एकत्रीकरण करून, भेळ करून वा मिश्रणातून धातू बनवितात .ज्या धातू वाहतुकीची साधनात, औधोगिक क्षेत्रात यंत्रातून अनेक ठिकाणी वापरण्यात येतात.
रसायन शास्त्रात तर निव्वळ अनेक घटकांची भेळ अथवा मिश्रण आहे .आणि त्या मिश्रणातूनच रासायनिक पदार्थ तयार होतात .साबण ,औषधे ,कॉस्मेटिक्स ,खते , पेस्ट , मंजन वगैरे यात, तसेच रंगांत पण रंग, तेल व इतर प्रवाही घटकांचे मिश्रणाने रंग बनतात .तसेच प्रवाही घटकांचे मिश्रण करून, भेळ करून योग्य मिश्रणाने रासायनिक प्रवाही पदार्थ पण बनतात .
. रसायनातील नैसर्गिक प्रवाही पदार्थ पाणी.ते पण हायड्रोजन व ऑकसीजनचे मिश्रणच आहे ना !
त्याच प्रमाणे वायूंचे विघटन केले तर कळते त्यात पण दोन अथवा अधिक घटकांची भेळ-मिश्रण
आहेच
तसेच कापड उद्योगात पण ६०/४०अथवा ६०/३० .असे सुती व सिंथेटिक धाग्यांचे मिश्रण असतेच
ना ?व जेव्हां असे मिश्रण नसते तेव्हां १००%सुती अथवा १००% रेशीम असे लेबल लावतात .
सूर्य प्रकाशाचे किरण पावसाच्या थेंबातून जेव्हां प्रसार होते. त्या प्रकाशाचे पृथक्करण होऊन सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसते .म्हणजे सूर्यप्रकाश पण सप्तरंगाचे मिश्रणच आहे .आपले शरीर पण पंच महाभूतांचे योग्य प्रमाणात मिश्रणच होऊन बनलेले आहे .
इतकेच नव्हे तर कुठलीही भाषा म्हणजे काय ? शब्दांचा योग्य समूह .त्यात शब्दांचे योग्य मिश्रण करून जोड शब्द तयार होतात .हे जोडशब्द म्हणजे शब्दांचे मिश्रण.व ते भाषेचा दर्जा वाढवितात.भाषेच्या व्याकरणात भर करतात .भाषेला समृद्ध करतात. जसे पंचपाळे,त्रिमूर्ती , नवरात्री वगैरे शब्दांनी भाषेच्या व्याकरणात समास तयार करतात .तसेच अनेक शब्दांना एक शब्द देऊन जसे गजानन ज्याचे मुख गजाचे आहे असा , कमलनयन ज्याचे डोळे कमळासारखे आहेत असा ,अथवा मीनाक्षी जिचे डोळे माशाच्या आकाराचे आहेत अशी,असे जोड शब्द वा दोन शब्दांची भेळ -मिश्रण करून भाषेचा कस वाढतो .
इतकेच नव्हे तर आपल्या भारतात सर्व जातीचे अनेक धर्माचे , वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक राहतात .सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. ती पण एक उत्तम भेळच आहे .
तेव्हा काय भेळ ही सर्वत्र आहेच. पण भेळ शब्दात भे आणि ळ यात मध्ये स अक्षर नसावे नाहीतर
भेसळ शब्द तयार होतो .आणि ती योग्य नाही .जसे बांधकामात रेती, सिमेंटचे योग्य प्रमाण ठेवले नाही तर बांधकाम कच्चे होते .सोनाराने सोन्याचे दागिने बनवितांना तांबे जास्त मिसळले तर सोन्याचा कस कमी होतो.खाद्य पदार्थात टीप कागदचा क्रीम म्हणून तसेच लाकडाचा भुसा वा इतर वस्तूंचा व्यापारी लोक खाद्य पदार्थात वापर करतात. ती भेळ नव्हे ती भेसळ आहे . व तसे करणे अयोग्य आहे . सध्या आपण पाहतो नको त्या व तसेच शरीरास अपायकारक अश्या वस्तू खाद्य पदार्थात राजरोस वापरतात व त्यामुळे आता अश्या खाद्य पदार्थान वर बंदी आणली आहे . कारण ती अयोग्य आहे हानिकारक आहे
तर सर्वच क्षेत्रात भेळ आहे. पण भेसळ नसावी .ज्या त्या क्षेत्रात भेळ करतांना सर्वांनी थोडी
नितीमत्तेची, उत्पादकांनी गुणवत्तेची चाड ठेवली तर सर्व क्षेत्रात सुखद ,सात्विक, चवदार, सकस,कसदार पोषक वस्तूंची तसेच पदार्थांच्या उत्पादनांची उत्तम भेळ अनुभवता येईल .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा