रविवार, ३० नोव्हेंबर, २०१४

gappa


                                              गप्पा

    भाजी मार्केट मधे भाजी घेऊन झाल्यावर, अचानक जुनी मैत्रीण भेटता ब-याच गप्पा झाल्या तरी, "चल ग ,

 आता  जाऊ या. आपल्या गप्पा काही संपणार नाहीत असे म्हणत ,पुन्हा तेथेच रेंगाळत , पाय  दुखू लागले तरी बाजूच्या कट्ट्याचा आधार घेत गप्पा करणा-या  मैत्रिणी आपण पहातो .अथवा आपण पण त्यातील एक, कधी कधी असतो  वा भेटलेल्या  दोन   मित्रात  एकमेकांना निरोप देता देता" या ना घरी, मस्त गप्पा करू यात" . असे उद्दगार ऐकू येतात .

             परवाची च गोष्ट बाजूच्या काकू चेहरा पाडून बसल्या होत्या.   काय झाले विचारले तर बसक्या आवाजात म्हणाल्यात, " काल रात्री,  आमच्या कडे गप्पा  रंगल्या होत्या  पण  माझा आवाज,घसा बसल्याने मी काहीच बोलूच शकले नाही ना !." किती विरस झाला माझा . नेमका सर्व  गप्पा मारावयास जमले होते  व  मी गप्पात सहभागी होऊ शकले नाही .

             खरच, गप्पा गोष्टी करण्यात काय  मजा असते ना !  ती गप्पीष्ट लोकांनाच त्यातील मजा कळते . मुखस्तंभा सारखे बसणा-यांना  त्याची मजा कळत नाही . म्हणतात  ना ' गाढवाला काय गुळाची चव"  तशातले आहे.

           दोन वा अधिक व्यक्तित,  जे भाष्य होते, ते संवाद वा संभाषण  वा गप्पा. एकटा  स्वत;शी बोलतो ते स्वगत . वाच्यता वा भाष्य करणे ही देवाने मानवास दिलेले अमुल्य वरदान आहे. त्यात मेंदू बहाल केल्याने मानवाने भाषा शोधली . त्यामुळे भाषेत शब्दांचे स्थान महत्वाचे आहे .योग्य ते शब्द रचून वा  जोडून मानव आपले विचार , मत , भावना  आपले ज्ञान ,व मंतव्य दुस-यास सहजतेने सांगतो, पटवितो,गळी  उतरवितो . विचारांचे आदान प्रदान करतो शब्दांना  शब्द जोडू गप्पा  रंगात  येतात . बोलण्यात , गप्पात शब्दाला महत्व असते

           गप्पा मारणे  प्रत्येकास आवडते . म्हणूनच तर "या ना  घरी गप्पा गोष्टी करू "असे उद्दगार कानीं येत असतात. आणि एकदा भेटले कीं गप्पांना विषय मिळत  रहातात . अगदी  राजकारण ,स्वयंपाक घर ,वाढती महागाई .दोन पिढीतील अंतर ,हल्लीचे मुलांचे वागणे ,सध्याचे हवामान,पाऊस ,गर्मी  पासून एवढेच काय हल्लीचे चित्रपट ,टी व्ही वर न चुकता पहाण्यात येणा-या मालिका (काय फालतू मालिका आहेत) म्हणत नाव ठेवत  मलिकांची चर्चा वा कामवाल्यांचा  त्रास , ते थेट  मोदीचा देशभर गवगवा  पर्यंत चौफ़ेर गप्पा  रंगतात . गप्पांना उत येतो. गप्पात चौफेर विषय हाताळले जातात .

            अगदी बालपणात पण डोकावून पाहिले अथवा  बालपण आठविले तर वर्गात शिक्षक शिकवीत असता बाजूच्या अथवा पुढच्या वा  मागच्या विद्याथ्याशी बोलल्याने व त्याच वेळी डोक्यात आलेला विचार त्यास  सांगणे आणि  शिक्षकांनी नेमके " अरे गप्पा मारू  नकोस , मी येथे शिकवीत आहे आणि गप्पा काय मारतोय  ,   उभे रहा ," अशा रीतीने त्यावेळी भोगलेल्या शिक्षेचे कारण पण गप्पा असायचे . पण गप्पा केल्या नाही तर आपले विचार दुस-यास  कसे कळणार ?

            टेलिफोन वरून अर्धा तास, पाऊण तास गप्पा  बसायची  सवय असते . त्यात तर भेटीचा आनंद मिळतो . सर्वाची खुशाली, खबरी कळतात  . पूर्वी पत्राव्दारे नंतर फोन.  आता तर social media मध्ये इतकी सुधारणा झाली आहे  कीं  क्षणात   साता समुद्रापार पण chating voicemail  आणि whatapp सारख्या माध्यमातून एकाशीस नाही तर ग्रुप बनवून गप्पा करू शकतात . एवढेच काय Skype तून तर थेट त्यांच्या घरात शिरून प्रत्यक्ष पाहत त्यांच्या समवेत गप्पा करण्याचा कार्यक्रम करतात , गप्पांचा मनसोक्त आनंद लुटून भेटीचा आनंद मिळवतात.

             महिलांची किटी वा भिशी  काय प्रकार आहे ? फुरसतीच्या वेळात, नव्हे तर वेळात वेळ  काढून गप्पा करण्याची बैठक च असते. प्रत्येक जण हिरीरीने गप्पात भाग घेत असतात.  महिनाभराने भेटल्याने आपले विचार ,अनुभव, दुस-यां  सोबत  शेअर करतात . खेडे गावात गावाच्या वेशीवर झाडाचा  पार म्हणजे    गावक-यांना  एकत्र होऊन  सुख दु:खाच्या गोष्टी करण्यास  खुशाली जाणण्यास  व खुशाली कळविण्यास   गप्पाची बैठक च असते . शहरात वाचनायाल ,बगीचे ,क्लब , सोसायटीचे कॉमन प्लॉट ही सर्व ठिकाणे देखील  गप्पांचे अड्डे च आहेत. तसेच शहरात पण कॅफे हाउस , किंव्हा चहाच्या टप-या काय , हल्ली तर चहाच्या आधुनिक chiawia सारख्या टप-या पण गप्पाची बैठक वा गप्पा रंगात  येण्याची ठिकाणे झाली आहेत.प्रवासात तर गप्पा मुळे  वेळ कुठे गेला कळत  नाही . नवीन ओळखी होतात .  बिझनेस करणारे तर गप्पा केल्या शिवाय राहूच शकत नाहीत . गप्पा हेच तर त्यांच्या जाहिरातीचे प्रमुख माध्यम  आहे .

              गप्पा करून मनास मनस्वी आनंद मिळतो जीवास विरंगुळा  लाभतो कित्याकदा मनातील साचलेले विचार बाहेर निघून मन स्वच्छ  होते.तसेच चार जणात गप्पा करून चार अनुभवाचे ,ज्ञानाचे कण  मिळतात . चांगले विचार कळतात.  गप्पा केल्यानी मनाची दारे उघडी होऊन गप्पातून चारलोकात बोलल्याने हृदये हलकी होतात . तेव्हा गप्पा करणे केव्हाही चांगलेच . जसे हसणे  आरोग्यास आवश्यक  आहे  त्यामुळे सध्या जागो जागी हास्य क्लब निघाले आहेत . तसेच गप्पा करणे पण जरुरी आहे . चला  तर मग मनसोक्त गप्पा मारुयात  .               
                                  वैशाली वर्तक                      

मंगळवार, ३० सप्टेंबर, २०१४

pravasi nauka canada /us chi

                                                        प्रवासी नौका कॅनडा यूएस  ची 
Canada/ US ची  प्रवासी  नौका, तयार  केली धवल ने, 
हळूच  प्रवाह पतीत केली, कल्याणी नितीनने
अवीच्या साथीने  उलगडली, इतिहासाची पाने वैशुने ,
धवल  स्नेही,  पाठक कुटूंबियानी, केली मदत मनोमने 
शुभदा मनोहर कुटुंबीयांनी, आणली गप्पात रंगत,
घडविले  Ottava  दर्शन, देवून साथ अन संगत. 
खळदकरांनी   केली, साथ  प्रारंभा पासून 
मदतीचे   लांबविले हात , Toranto  मधून . 
मधु दादा प्रतिभा वहिनीनी, स्वागत केले सह्रदया ने
यशस्वी केली  ट्रीप, वेळात वेळ काढून श्रीधर ने . 
ओलांडूनी   कॅनडा, प्रवेशिते झालो सीमा कडे
अवनीश ने कवनाने ,स्नेहाकेदारने केक ने व मुलांनी भेटकार्ड ने
       भरघोस वर्षाव केला , अभिनंदनने  व  स्वागताने.  
भव्य दिव्य अमेरिकेचे, दर्शन करविले अवनीश ने
new york  चे रस्ते व इमारती, पाहून डोळे दीपले अमुचे 
चतुर्थीला  घडवून दर्शन पटवर्धननांच्या  , श्री गणरायाचे, .
भारतातच आहोत जणू ,भासविले सीमाने
वंदन करुनी गणेशाला , वाट चाल केली फ्लोरेडा कडे,
भरपूर आदरा तिथ्य  केल , हेमंत अन  रोहिणीने
सचिन अमिता ने दाविले ,वेडे वाकडे रस्ते  Sacramonto  चे
                    Golden Gate तर कधी ,  पुरातन कालीन  भली मोठी वृक्षे Big Basin Red Wood                      
तिन्ही भावांनी मिळूनी, अनुभवली दिवाळीची झलक
श्रेयश  सच्चीदानंदाने, जेवू घातले समूह जेवण   .
                                कधी नेले श्रेयस ने Microsoft  भूमीत (Yahoo, Google, Facebook)
तर कधी निसर्ग रम्य  Lake Tahoe च्या कुशीत
  श्रेयस च्या बेमालूम, driving च्या  skill  मधुन
                                     मीरा वर्तक, लिमये शुभदा च्या ,  भेटीचा योगआला  जुळुन                                         अविनाशने दिला जुन्या  आठवणींना  उजळा
बंधुराजाला पाहून, उषाच्या   प्रेमाला आला उमाळा. 
भालुने  सहर्ष स्वागताने, दाखविली कर्मभूमी
" असाच ये "पुन्हा पुन्हा, वदती झाली उषा भगिनी
गौरी ने केले हसत मुखाने स्वागत
         पाहून वैभव तिचे हरखले आमचे मन
            उषाने योग आणला विनय-रेखाच्या  च्या भेटीचा             
                                            दिलीपने साजरा केला वाढदिवस आई व मामाचा                                     
 प रत रमलो, सीमा सदनी
भव्य  दिव्य, अमेरिका पाहूनी
बसलो चौघे, मारीत गप्पा ,
काय सुंदर योग, आणलास  बाप्पा ,
                                    
                                                                                                वैशाली वर्तक
                                              
                                              

गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०१४

shikvan

                                                                 शिकवण
        ऐ ," मला शिकवण  देऊ नकोस हं ! मला माहित आहे आणि कळतय पण, काय करावयाचे ते. जरा   काही झाले  की  , तुझा शिकवणीचा पाठ सुरु . म्हणे शिका आमच्या कडून .  अगोदर स्वत: ने काय केले ते पहा .शिकवण देणे सोपे आहे . " असे संवाद वारंवार घरा- घरातून ऐकू येतात. कोणास पण शिकवण दिलेली आवडत नाही . सूचना, उपदेश, साधे बोलणे वा  सुचित करणे शिकवणीत जमा होते . खरे पहिले तर शिकवण घेणे मोलाचे असते. पण आम्हास माहित आहे  अथवा मला माहित आहे ची भावना मनात घर करून असते . त्यामुळे अहंभाव जागृत होतो. वा आड येतो.  
        तसे पहिले तर प्रत्येक माणसाची त्याच्या आईची शिकवण ही पहिली शिकवण असते .अगदी  बोट घरून उभे करून चालण्यास शिकवण्या पासून संस्काराची बाळगुटी पाजून, प्रत्येक माता बालकास उत्तम संस्काराची शिकवण देते . ज्या शिकवणीच्या जोरावर जीवनाचा डोलारा उभा रहातो . पुढे गुरुजनांची शिकवण जीवन नौका तरून जाण्यास मदत रूप ठरते . एवढेच  नव्हे  तर शिकवण घेता घेता मित्रांची मैत्री रुपाची शिकवण पण खूप काही शिकवून साथ देते, तर एकजुटीची शिकवण  समाजा कडून प्राप्त होते .
       निसर्ग तर  क्षणा क्षणाला  न बोलता शिकवण देत असतो . साधा सूर्यच पहा ना रोजच नियमित पणाची शिकवण देतो . फुले,  पाने, वृक्ष , नदी सागर सर्वच आपापल्या परीने माणसास शिकवण देतात . आणि मनुष्य पण या निसर्गातून शिकवण घेत असतो  व त्याला  स्वत:च्या  जीवनात मानसिक आघार मिळतो .
       मुकी जनावरे जी अवती भवती आपल्या फिरत असतात ती पण शिकवण देत असतात . मानव स्वता:ला मेंदू असल्याने महान  समजतो . पण त्याला मुके जनावर कुत्रा, तो पण मालकाशी  इमानदारी कशी बाळगायची याची शिकवण देतो . साधे कीटक, मुंगी मध माशी काय,  सतत उद्योगी रहा तर   कोळी किटक स्वत:चे जाळे  विणताना कितीदा पडला तरी हार न मानता प्रयत्नशील रहाण्याची शिकवण देतो.
      तेव्हा आपण पदवीधर झालो ,मोठ्या पगाराच्या नोक-या  मिळाल्या व सर्व भौतिक सुखे प्राप्त करून नामांकित झालो म्हणजे दुस-यांचे शिकवणीचे बोल ऐकावयाचे नाही असे नसते पण तेथे आड येतो तो अहंभाव .
     तसेच अनुभवाने मिळालेल्या ज्ञानाचे  शिकवणीचे पाठ प्रत्येक  पुढचा मागच्यास देत असतो . ती  अनुभवाने  जास्त उन्हाळे पावसाळे पाहिल्याची  अथवा स्व:ताने अनुभवलेल्या ज्ञानाची शिकवण असते म्हणूनच  तर  पुढच्यास  ठेच  मागचा  शहाणा  असे  म्हणतात .  ते  काय  उगीचच .   तेव्हा   अनुभवाने  पण शिकवण मिळते त्याचा फायदा घेतला पाहिजे . व आपण तो घेत असतो . असेच अनुभावाचे बोल काही जण लिहून  काढतात ती पुस्तके लिखाण रूपाने आपणास   शिकवण  घेण्यास उपयोगी ठरतात . साधे सोप्या भाषेत लिहिलेले   रामदासांचे मनाचे श्लोक आधुनिक काळातील गीता च आहे .
    शिकवण ही अगदी अनादि काळापासून चालत आली आहे . कृष्ण सुदामांनी सांदिपनीच्या आश्रमात जाऊन तर  राम  लक्ष्मण  यांनी वसिष्ठ मुनींच्या आश्रमात जावून शिकवण घेतली .त्या  काळी गुरु घरी जावून शिक्षण  घेत व त्या शिक्षणाची , शिकवणीची गुरु दक्षिणा  देत . तेव्हा आपल्या संस्कृती त पण  "गुरु पौणिमा"गुरुनी दिलेल्या शिक्षणाची कृतध्नता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा करतात .
    तसेच धर्म म्हणजे तरी काय ? प्रत्येकाच्या रोजच्या जीवनातील चाली रिती . तेव्हा कुठला ही  धर्म असो पंथ  असो सर्व धर्माची शिकवण एकच असते . प्राणीमात्रांवर प्रेम करा , दया भाव ठेवा , विश्वबंधुत्वाची भावना मनी ठेवा ,चोरी करू नका, असत्य, दंभ ,मत्सरी पणा, अहंकृती सोडा . म्हणजे सर्व धर्माची शिकवण एकच असते आपल्याला  संत लोकांनी पण तीच शिकवण दिली आहे . त्या  शिकवणीच्या जोरावर  आपल्या संस्कृतीची मुळे खोलवर रुतली आहेत.  कुठल्याही पंथात संतानी सांगितले की
                                 नको हेवे दावे ,नको भेद भाव ।
                                  सर्व धर्म समान , सांगे संत वाणी ।।
        महाभारतातच  पहा ना ! भर  रणांगणात,  कुरुक्षेत्रात आपलेच बांधव  पाहून, युद्धापासून विन्मुख झालेल्या अर्जुनास श्री कृष्णाने जीवनाचे सार , तथ्य  सांगितले . तीच महान 'गीता' आज आपणा  सर्वांना जीवन तरून जाण्यास बोध रूपाने अमृतमय 'शिकवण 'आहे .
      तेव्हा शिकवण ह्या शब्दाचा राग न करता अहंभाव दूर सारून शिकवण घेतली पाहिजे व तशीच दिली पण पाहिजे .

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...