किल्ली
काय वैताग आणलाय या किल्लीने ! सळो की पळो करुन सोडले. एवढी छोटीशी वस्तू पण ,जर व्यवस्थित जागी ठेवली नाही की झाले. खरच म्हणतात ना, गरजेच्या वेळी वस्तू व नोकर मिळाले तर स्वर्ग लाभल्याचा आनंद मिळतो. पण छे कुठले काय ? इतके कुठले आपले भाग्य ? कुठे ठेवली गेली काय माहित नाही. सकाळी बँकेत जाताना कायनेटिकची किल्लीमिळालीनाही,त्यावेळीस डूप्लीकेट किल्लीचा वापर करुन बँकेत उशीर होत असल्याने वेळ तरी निभावली. बरे झाले ,ती डूप्लीकेट किल्ली तरी मिळाली.नंतर बँकेत पोहोचल्यावर टेबलाची किल्ली पर्स मध्ये असून दिसत नव्हती. त्यामुळे तेथे पण किल्लीने त्रास दिला. संध्याकाळी घरी आल्यावर मंडळाच्या मिटींगला जावयाचे होते, पण मागच्या मिटिंगचे, मिनीट्स लिहावयाची डायरी ज्या कपाटात ठेवली होती, त्या कपाटाची किल्ली मुलाने कोठे ठेवली, ती न मिळाल्याने शेवटी मिनिट्स पुन्हा लिहून काढण्याचा खटाटोप करावा लागला. अशा रीतीने आज मीराची किल्ली या वस्तूने मानसिक स्थिती पार बिघडवली होती.आज जरा वैतागून च मीरा झोपली .
मीराला झोप लागली. थोड्याच वेळात काय गंमत ! दिवस भरात न मिळालेल्या किल्ल्या मीराला वाकुल्या दाखवित होत्या. व नाचत होत्या .त्यातील कपाटाची किल्ली तर म्हणत होती, काय ग , का वैतागता आमच्या सारख्या निर्जीव वस्तूंवर ? आम्ही तर तुमच्या सुखसोयीसाठी आहोत.तुमच्या वस्तू, तुमची घरे, वहाने यांच्या सुरक्षिते साठी आम्ही आहोत. स्वत: नीटव्यवस्थित तुम्हीच नियत केलेल्याजागी
आम्हांस ठेवा बस. रहा की मग निर्धास्त होवून . आमच्यावर भरवसा ठेवून जगभर ,देशभर ,गांवभर हिंडता .कुलूप नीट लावून दोन दोनदा ओढून खेचून बंद केले ना याची खात्री करता . पण मग निर्धास्त होवून आम्हास पर्स मध्ये कपाटात वा इतर नियत जागी जपून ठेवा ना ! म्हणजे वैतागावे लागणार नाही .

आमची ऐटच आहे तशी.घराशी आल्या आल्या प्रवेशकरताना आमची प्रथमआठवण होते.घरात
शिरताच डाव्या अथवा उजव्या हाताला आमच्यासाठी आकर्षक घरे बनवून आमची जागा केलीअसते. बाहेर जाता तेव्हा पर्स मध्ये वा खिशात अगदी हृदयाशी जपून ठेवता .आमची रूपे
अनेक पण काम मात्र एकच मानव जातीची सेवा करणे .तुमच्या वस्तूंचीनीट काळजी घेणे .त्यांची
सुरक्षितता राखणे .आम्ही तुमच्या सेवेला विविध ठिकाणी हजर असतो .तुमच्या वहानांची सुरक्षितता जपतो .त्यामुळे तुम्ही धावपळीच्या जीवनात वेळेवर पोहचता .एवढेच काय घरातील कपाटे, बँकेच्या लोकरच्या किल्ल्या ,बाहेरगांवी जाताना सुटकेस ची किल्ली,ऑफिसेसच्या किल्ल्या ,अश्या अनेक ठिकाणी आम्ही तुमच्या सेवेला हजर असतो .

नवीन लग्न झालेल्या मुल्लींना कपाटाच्या
किल्ल्या सासूबाईंनी सांभाळण्यास दिल्या आहेत हो! म्हणत चांदीच्या छल्ल्यात आम्हाला अडकवून, कंबरेस लावून मिरवतांना मनात आनंद वाटतो ,पण

जवाबदारी पेलणे जमावे लागते .
लहान मुलांना आनंद देण्याच्या ठिकाणी पण आम्ही आहोतच .किल्ली दिली की चालणारी खेळणी तेथेपण आमच्याच किल्ली बिरादरीतील
किल्लीच असते. जिच्या सहाय्याने खेळणी चालतात. गाड्या धावतात, बाहुल्या नाचतात ,कुत्रे उड्या मारतात अश्या अनेक खेळण्यात आम्ही असतो पण त्या खेळण्याच्या किल्ल्या म्हणजेच आमचीच बदलती रूपे आहेत . हीं बदलती रूपे तुम्ही जपली नाहीत तर ती खेळणी निरुपयोगी होतात .आमचे काम एकच तुम्हाला आनंद देणे, तुमची सेवा करणे.

हाशsहुश करत ऑफिस मध्ये जाऊन टेबलाजवळ येता व प्रथम आठवण होते ती आमचीच समोर आवासून पडलेले काम पाहून पर्समध्ये भिरकवलेली किल्ली नाही मिळाली की जीवाची तडफड करता .पण आधीच योग्य जागी ठेवाना !.
आम्हीजाणतो सध्या धावपळीच्या युगात तुम्हा मानवावर कामाचा ,तसेच जवाबदारीचा खूप ताण पडत आहे. दिवस भराच्या दगदगीत जीव थकतोय पण आम्ही निर्जीव वस्तू करणार तरी काय?आम्हाला वाच्या नाही .वाचा असती तर ओरडून आम्ही कोठे आहोत.हे तुम्हास सांगितले असते. पणआम्हास तुम्ही मानवांनी या विज्ञान युगात वाचा दिली आहे . त्यामुळे कधी कधी आम्ही चमकून, प्रकाशित होऊन वा आवाजाने आमचे वास्तव्य कोठे आहे ते दर्शवितो .
आम्हासअडकविण्यासाठी कंपन्या ,बँका,
मेडीकॅल कंपन्या सर्व जण त्याच्या जाहिरातीसाठी
कीचेन काढतात त्यात आम्हास विराजमान करतात.
कुलूमहाशयांचे बरे असते एका जागी बसून
लटकून रहातात. त्यांना आम्ही बंद करून स्थगित करून ठेवतो.त्यामुळे त्यांना शोधण्याचा फार त्रास नसतो.

अरे हो ! कुलूप वरून आठवण झाली. पुर्वी रामराज्यात म्हणे चोऱ्या होत नव्हत्या. त्यामुळे आमचे महत्व कमी होते. आज पण शानि शिंगणापूर म्हणून गांव आहे. तेथे म्हणे कोणीच घरादारांना वाहनांना, दुकानांना कुलुपे लावत नाहीत. तेथे आमची उपस्थिती कमी जाणवते.
फार पुर्वी पासून भारतात अलीगडला आम्हांस बनविण्याचे अनेक कारखाने आहेत. तेथील कुलूप-किल्ल्या जगभर प्रसिद्ध आहेत. तसेच कित्येकांना कुलूप- किल्ल्यांचा संग्रह करण्याची पण आवड असते बरे का ! पुण्याला केळकर म्युझियम मध्ये तसेच हैद्राबादच्या सालारजंग म्युझियम मध्ये आमचे विविध आकार,विविध रूपे अगदी जुन्या काळापासूनच्या
कुलूप - किल्ल्या दिसतील.
आमच्यात एक ताई किल्ली असते . जिला मास्टर किल्ली म्हणतात.आमच्यातील कोणी एक उपस्थित नसेल तर ती सर्वांचे काम करते. असो. अर्थात आम्ही निष्ठेने सेवा करतो पण आम्ही सज्जन माणसांसाठी आहोत. दुर्जन ज्यांची वृतीच खराब त्याच्या समोर आमचे काय चालणार ? तेव्हां
तशा वृत्तीची माणसे कुलुपावर अत्याचार करून आमच्या शिवाय तुमच्या सुरक्षितेत बाधा आणतात. त्याला आमचा नाईलाज असतो.

कॉम्पुटर युगात पण आमची भौतिक नाही पण सांकेतिक चिन्हांनी आमचे अस्तित्व आम्ही ठेवले आहे. तेथे आमची आकार विरहित शाब्दिक रूपे आहेत. साहित्यात पण आम्हाला सुविचारात
वैशाली वर्तक.(अहमदाबाद)
वापर करतातच की,"परिश्रम हीच यशाची गुरु किल्ली"आहे.
आणि हो !एवढेच काय ! जीवनात सकारात्मक भावना अथवा विचार ठेवले की जीवनाकडे पाहण्याची वृत्ती बदलते .व यशस्वी आयुष्य जगता येते तेव्हा आयुष्याच्या यशाची गुरु किल्ली कळली की सर्व कसे निर्मल ,आनंददायी वाटते .ही किल्ली ज्याला मिळाली तो सुखी होतो.तेव्हा आमच्या सर्व सामान्य नामी किल्ली या शब्दात पण किती गूढ रहस्य आहे ना!
तेव्हा मीरा उठ. उगाचच वैतागून झोपलीस.वेंधळ्यासारखी वागल्याने उगाच त्रागा केलास. नीट पहा मी जागच्या जागी व्यवस्थित आहे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा