शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०२२

मृगजळ

 विषय - मृगजळ

  

नका करु वणवण

सुख आहे मृगजळ

 जाते  पळून दूरवर

दुःख राहते जवळ


सारे जीवन संपेल

सुख मात्र शोधण्यात

पण कधी उमजेल 

सुख आहे संतोषात



सदा पाणी समजून

मृग धावे पाण्यासाठी

 न मिळता थेंब पाणी 

निराशाच सदा पाठी


सुख दुःख  येणारच

जीवन  लपंडाव खेळ

एका नंतर एक येणार

आनंदाचा जमवा मेळ


आशेवर  भुलून न रहाता

करावे यत्न  हमखास

यश येईलच जवळ

मृगजळाचा नको भास



वैशाली वर्तक 

अहमदाबाद

गीत. जीवन कसे जगावे. ...जीवन उत्सव. व्हावे

 - जीवन कसे जगावे



मानव जन्म हा लाभला  करु सोने सर्वस्वाने

दिधले आयु ते देवाने  जगु जीवन आनंदाने   ... धृ

निशेत दडली पहाट   नसे तम सदाकाळ

का बाळगी भिती मनी  नको खंत कदाकाळ

आशेची सकाळ येता ,हो  सज्ज स्वागता हर्षाने      1


गाणे देई मना आनंद भरु सप्त स्वर मनात

होता संगीतमय जीव, व्यथा जाती दूर क्षणात

मनी राखता हे भाव,  भरे  जीवन सौख्याने         2


नदी धावे जीवन देण्या,  मग का रडत बसणे

करिते का खंत सरिता, काट्यात फुलाचे हसणे.

राहू सदा  समाधानी ,सुख येईल नित्याने           3


वैशाली वर्तक

अहमदाबाद (गुजराथ )

8141427430




भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच नाशिक आयोजित उपक्रम
विषय..जीवन उत्सव व्हावे 

इंद्रधनुष्यी  रंग सात
स्वर सात  संगीतात
सप्त वसती आरोही
अन् तेच अवरोहात

जीवन जगा सप्तसुरांत
 घेत साथ संगीताची
म्हणजे उजळे जीवन
येई मजा जगण्याची
 
येता रवी राजे नभी
ऐका सुरेल भुपाळी
होते मनही प्रसन्न 
सूर ऐकता सकाळी 

ठेवा सकारात्मक भाव
चाले सुखदुःखाचा खेळ
सुख उद्या येईल दारी
आनंदाचा जमेल मेळ

नदी धावे जीवन देण्या
मग का रडत बसणे
करिते का खंत सरिता
काट्यात फुलाचे हसणे.

ठेवा समाधान मनी 
दिधला जन्म देवाने
जीवन करा उत्सव सोहळा
जगुया  उत्साही आनंदाने

वैशाली वर्तक
अहमदाबाद

गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०२२

सांगू कसे तुला

अभा म सा प ठाणे जिल्हा  2
काव्य लेखन उपक्रम
विषय - सांगू कसे तुला


देवा दयाधना रे
तू  तर अंतर्यामी 
जाणून घे ना व्यथा
सांगू कसे तुला मी

मी काय  सांगणार
तुला असतेच जाण
तूची कर्ता करविता
तव मर्जीनेच हले पान 


घडू दे भेटी आप्त जनांची
कर सारे जग पूर्ववत
दूर कर आता  महामारी
काम करण्या अविरत 

सांगू कसे तुला
करिते आता विनवणी
शरण आले तुजला
समजून घे मनोमनी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सोमवार, १४ फेब्रुवारी, २०२२

प्रेमरंग. (प्रेम )

 महाराष्ट्र  साहित्य  सुगंध

द्वारा आयोजित  उपक्रम

विषय - प्रेम

षडाक्षरी रचना


*अबोल प्रीती*


नसते प्रेमाला

 कधीही गरज

अबोल हे प्रेम

उमजे सहज


स्मरतो पहिला

स्पर्श भावनिक

देतो आठवणी

मना साहजिक

ऐका

गंध तो प्रीतीचा

राहतो अंतरी

वसंत फुलतो

मोद भरे ऊरी


प्रेमाच्या क्षणांची

मनी आठवण

सदा राही मनी

गोड साठवण


अबोल प्रेमाने

मिळतो आनंद

जीवाला लागतो

भेटण्याचा छंद


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

गुरुवार, १० फेब्रुवारी, २०२२

शतदा प्रेम करावे

कल्याण डोंबिवली  महानगर 2
आयोजित  उपक्रम
विषय - शतदा प्रेम  करावे

      प्रेमात ईश्वर

वसे प्रेमातच ईश
सदा रहावे प्रेमळ
प्रेमभाव प्राणीमात्र
 रहा  ईश्वरा  जवळ

 
 फळ  संचित कर्माचे 
जन्म दिधला देवाने
लावू  तयाला सार्थकी
जगुया  प्रेम भावाने


द्यावे प्रेम दीन पतितांना
तेची असे देवाचे कर्म
देव हसे तया मुखातून
हेची जाणा जीवनाचे मर्म

देव वसे निसर्गात
वसे जलचर सृष्टी  तयात
वाढवा प्रेमे  तरु लता
प्रेम मिळते  मोदात

 प्रेम  करावे शतदा
जसे माता करी पाल्यावर
तसे असावे निस्वार्थी प्रेम
शतदा प्रेम अमुल्य जीवनावर

 वैशाली वर्तक 
अहमदाबाद

समाजाचे ऋण


अभामसाप कोप्र महाड समूह
आयोजित  उपक्रम 
९/२/२२
विषय - फेडिता 
समाजाचे ऋण




येता मनुष्य जन्मास
  समाजात  ज्या वाढतो
ऋण असती समाजाचे
  त्याचे देणे तो  लागतो.

सदा  दावा माणुसकी 
तोची असे खरा धर्म
ठेवा सम भाव सर्वांशी
तेची  जाणा जीवनाचे मर्म

उठवा पतित जनांना
ते ही आपुलेच बांधव
द्यावा हात मदतीचा
हेची सांगती राघव

पहा बाबा आमटेजी
केले अर्पण  जीवन
 सेवा  केली कुष्टी रोग्यांची
  ऋण त्यांचे माना मनोमन

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

बुधवार, ९ फेब्रुवारी, २०२२

अष्टाक्षरी वय चालल वाढत


वय चालल वाढत

दिन ,महीने , वर्षाचा 
वेळ चालला सरत
कळे वळूनी पहाता
वय चाललं वाढत      1

कसा भुर्कन उडाला
रम्य होता बाल्यकाळ  
मनी आठव येताच
वाटे तो सुवर्ण  काळ    2
 
स्वप्ने रंगविली मनी
असताना तारूण्यात
वेळ सरली ती पण
आनंदात उत्साहात         3

बहरली साहित्यात               बहरली साहित्यात 
तव सुंदर लेखणी                 मम सुंदर  लेखणी
रमतेस तू सदैव                   रममाण मी सदैव
फुलवण्या ती देखणी    4     फुलवण्या ती देखणी


लाभो निरोगी आयुष्य            देवा तूची कृपावंत
घडो वृद्धी  साहित्यात           घडो  साहित्याची  सेवा
मिळो सुख समाधान              मिळो सुख समाधान
वाढणा-या आयुष्यात        5     हाच जीवनाचा ठेवा


वैशाली वर्तक 
अहमदाबाद 
गुजरात


दिवस,महीने  ,  पहा वर्षही
वेळ चालला     आहे  अविरत
कळे पाहता. .    वळून मागे 
 वय पण चाले   वेगे वाढत.

गीत...... माझ्या भारत देशाचा.

देशभक्ती गीत  माझ्या भारत देशाचा, मला  सदा अभिमान प्राणाहून असे  प्रिय, तयाच्या  गौरवात शान भाव वसे समतेचा ,धर्म नांदती अनेक नसे भेद- भाव जन...