शुक्रवार, १० सप्टेंबर, २०२१

अष्टाक्षरी. गणपतीकाव्य 3/ तुझेरुपपचित्तीराहो/विराजले गणपती/अष्टाक्षरी /अभंग


काव्य - अष्टाक्षरी ओळ काव्य
ओळ -  तुझे रुप चित्ती राहो

गणराया गजानना
मुखी  राहो तव नाम
महिम्यात नावाच्याच
दिसे सर्व तीर्थ धाम

शुभंकर तू सर्वांचा
बाप्पा वाटे तू आपुला
येता कठीण समय
स्मरताती जन तुला

तुझ्या नामात  आनंद
गुण गातो आवडीने
*तुझे रुप चित्ती राहो*
सदा पाहतो भक्तीने


कार्यारंभी तुला बाप्पा
पूजताती भक्तीभावे
तुझे नाम ओठी येता
यश मिळे सर्वा ठावे

होता आगमन  तुझे
घर भासते मंदीर   
पूजा पाठ भक्ती भावे
दर्शनास मन अधीर  

वैशाली वर्तक 

विषय -- विराजले अधिपती
ओळ काव्य
      *आनंद सोहळा*

वेध लागे गणेशाचे
येता भाद्रपद  मास 
कशी करुया आरास
मनी विचार ते खास           1

 स्वागताला खास दारी
रेखाटली  ही रांगोळी
फुले तोरणे लावुनी
लावियल्या दीप ओळी          2

ढोल ताशे वाजवित
केले स्वागत   आनंदे
*विराजले आधिपती*
मन भरले स्वानंदे                  3

रुप तुझे पाहुनिया
मन माझे झाले शांत
तूची आहे सुखकर्ता
कसलीच नसे भ्रांत           4          


विराजले अधीपती      
पाहताच चित्ती ठसे 
 ऐटदार ते बसणे      
 मना मनातूनी वसे              5

अधिपती आले घरी
भक्त येती दर्शनाला
वाटे अपूर्व  सोहळा
येतो  हुरुप मनाला          6

वैशाली वर्तक 
अहमदाबाद



*स्पर्धेसाठी*
सावली प्रकाशन  समूह  आयोजित 
राज्यस्तरिय  अभंग लेखन स्पर्धा
विषय -- *तूच सुखकर्ता*
        
            
तूची  असे कर्ता  । तूची करविता  । 
तूची सुखकर्ता  ।  श्रीगणेशा  ।।              1

कार्यारंभी तुज   !   प्रथम पुजितो l
 तुलाच स्मरतो ll   विध्नेश्वरा l                2

सर्व  व्यापी  तूची l  तूची लंबोदर l
ज्ञानाचा  सागर  l  तू  ओंकारा   ll            3


राहो आम्हावरी l    तव कृपा दृष्टी l
नको करु कष्टी l     सुखकर्ता  ।।             4

*तूची सुखकर्ता*  । तारी अवदसा  
दावी कवडसा  ।  तूचीआता                       5

वैशाली वर्तक 
अहमदाबाद ( गुजरात)
      



     



शब्दवेड साहित्य  समूह
काव्य - यंदाचा गणेश उत्सव
  
     *काळजी आरोग्याची* 

सण आला गणेशाचा
उत्साहाला येणार उधाण
भाग्य आपले यंदा चांगले
महामारीची उतरती कमान

काळजी घ्यावी प्रत्येकाने 
मास्क लावणे आवश्यक
अंतर पाळा सुरक्षितेने
नका करु गर्दी  अनावश्यक

आपले आरोग्यआपल्या हाती
सरकारचे नियम  पालन
लसी करणात नको दिरंगाई
रोगाचे  बंद करु दालन

कायम स्वरुपी हवी मूर्ती 
विसर्जनाची युक्ती नामी
घरीच करु विसर्जन 
गर्दीत  टाळण्या येते कामी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद




शब्दशिल्प कलाविष्कार  संघ आयोजित 
गणेशोत्सवानिमित्त दहा दिवसीय  राज्यस्तरिय 
काव्य लेखन स्पर्धा क्रमांक  16
विषय - देवा तुझ्याच चरणी

अष्टाक्षरी रचना
        

 श्रीगणेशा मिळे  मज
सुखानंद अविरत
*देवा तुझ्याच चरणी*
अनुभवे मी खचित

दूर होती सा-या चिंता
जाते शंकेचे मळभ
मिळे मना सुख शांती
कामे होतात सुलभ

 येता प्रसंग कठीण
तूच असता तारक
धाव घेती तुझे पायी
तूची विश्वाचा पालक

घेता तव नाम ओठी
दुःखे  होती दूर  सारी 
देवा तुझ्याच चरणी
भासे मज जादू न्यारी

देवा तूची विध्नहर्ता
आले मी तव चरणी  
 मज दे तव आशीष
हीच करिते मागणी   

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

*स्पर्धेसाठी*
सावली प्रकाशन समूह आयोजित  गणेश जयंती निमित्त 
अष्टाक्षरी काव्य स्पर्धा
स्पर्धेसाठी
विषय - माझा गणपती बाप्पा
         
      *अधिपती गणपती*

*माझा गणपती बाप्पा*
रूपे सुंदर  गोजीरा
भासे सदा स्नेहदायी
श्रीगणेश तो साजिरा        1

चौदा विद्या  अवगत
तव महिमा अपार
अधिपती तूची बाप्पा
कुणी म्हणती मंदार            2

*माझा गणपती बाप्पा*
बाप्पा, वाटे तू आपुला
येता कठीण समय
स्मरताती जन तुला              3

रूप तुझे पाहुनिया
मन माझे होई शांत
तूची आहे सुखकर्ता
नुरतेच  सारी भ्रांत                  4

दिन असे चतुर्थीचा
आले भक्त दर्शनाला
जन्मदिन आज असे 
मोद होतसे मनाला                 5
  

करू साजरा सोहळा
गणेशाचा पहा थाट
तीलकुंद चतुर्थीला
आनंदाची आली लाट   6


वैशाली वर्तक 
अहमदाबाद


अष्टपैलू  संस्कृती  कला अकादमी , मुंबई (रजि)
आयोजित 
अष्टपैलू काव्यमंच साहित्य  समूह
उपक्रम क्रमांक 63
साप्ताहिक उपक्रम
माघ शुध्द  चतुर्थी *श्री गणेश जयंती*निमित्त 
विषय - गौरीनंदन
*गणेश वंदना* 
श्री गणेश जयंती
तव नामाचा महिमा
शब्द नसे गुण गाया
तुची असे सुखकर्ता
गजानना  गणराया         1

शुभंकर गौरी नंदना
बाप्पा वाटे आपला
तूचीअसे दुःख हर्ता  
किती नांवे रे तुजला        2

असे माघी जन्मोत्सव
माघी गणेश जयंती
  केला  दृष्टांचा संहार 
तीलकुंद चतुर्थी वदती     3

असे प्रथम पुजेचा 
तुजलाची  सदा मान
देतो आनंदी जीवन
करी  तुझाची  सन्मान          4

वेद सिद्ध , एकदंत
रणांगणी  धुरंधर
करी दुष्टांचा संहार
ठेव कृपा निरंतर                 5

चौदा विद्या अवगत
तव महिमा अपार
अधिपती स्वामी तूच
कुणी म्हणती मंदार               6

सौ वैशाली अविनाश वर्तक 
अहमदाबाद 
गुजरात 
  




काव्य निनाद साहित्य मंच, पुणे आयोजित 
साहित्यिक गणेशोत्सव 
उपक्रम क्रमांक 3
विषय ... आधुनिक बाप्पा 
शीर्षक..  बदल उत्सवात

येता मास भाद्रपद 
वेध लागती गणेशाचे
कशी करावी आरास
यात मन लागे सर्वांचे

काळा प्रमाणे घेऊ दक्षता
मूर्ती बसवू, स्वरूपीं कायम 
विसर्जित करू नियत जागी 
पाळता पर्यावरणाचे नियम


दिसणार नाही आपणास 
छिन्न विच्छिन्न रुप गणेशाचे
 राहतील जलाशय  स्वच्छ 
रक्षण होईल जलचर जीवांचे

 होतो श्रींच्या आगमनाने,   
 आनंद हे तर आहेची खचित 
  पण जोरात वाजविता वाद्ये
 आवाज प्रदुषण नसे उचित 
  
  हेच सारे घेता ध्यानी
  करण्या उल्हासात  सोहळा
  *आधुनिक  गणपती उत्सवा*
  सारे जन झाले पहा गोळा.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

मंगळवार, ७ सप्टेंबर, २०२१

भोजनालय

सावली प्रकाशन समूह आयोजित 
 काव्य लेखन 
विषय - भोजनालय 
 *उदरभरण* 
होता सकाळ प्रश्न जेवणाचा
 असतो गृहीणीच्या मनोमनी
 काय करावे भोजनास याचा
 विचार करीते त्या क्षणी 

 आता काळ बदलला असता
 भोजनालय  असतीठाव 
जाता नोकरी शिक्षणाने दुजे गावी 
भोजनालयाकडे घेती धाव 

 चव बदल म्हणूनी जाती 
सर्व सामान्य सुध्दा जन 
आस्वाद घेण्या भोजनालयी 
भक्षण करुनी होई संतुष्ट मन 

 गतीशील जीवन मानवाचे
 भोजन बनवण्या वेळनुरे 
 कधी लवकर जावे लागता
उदरभरण तर हवेच हे खरे


 म्हणूनच संबोधती तयांना 
अन्नपूर्णा , उदर भरण नावे
 खरोखर असती नावा प्रमाणे
 भोजनालये सर्वत्र गावे 


 वैशाली वर्तक अहमदाबाद




रविवार, ५ सप्टेंबर, २०२१

चित्र काव्य

चित्र काव्य भेळ खातानाचे






सप्तरंग कला , क्रीडा,विज्ञान, साहित्य  व संगीत अकादमी

आयोजित 

राज्य स्तरीय चित्र काव्य स्पर्धा २०२१


होते  खात मजेत चविष्ट भेळ  
गेले लक्ष पेपरातील चित्राकडे
काय योगायोग  आला जुळूनी
चित्रातील मुले पाहती भेळेकडे.


लहान  पोरे, करीती याचना
जणू चवदार भेळेकडे पाहूनी
 दीनवाण्या मुलांचे चित्र  पाहता क्षणी
घास भेळेचा माझा राहिला , अडूनी.


होती ती चमचमीत चविष्ट भेळ
पण चित्राने मन  माझे गहिवरले
भेळ तशीच पेपरात ठेवूनी
मन विचारात  गुरफटले


लहान मुले गोजीरवाणी
हट्ट करिती भुकेने भेळेसाठी
अन्,.. मी मात्र , आस्वाद घेते
भरल्यापोटी   स्वानंदासाठी


वैशाली वर्तक 
अहमदाबाद



बुधवार, १ सप्टेंबर, २०२१

पंचाक्षरी ...,प्रेमातील गोड तक्रार.... किर्ती महान

माझी  लेखणी = 2
विषय - प्रेमातील गोड तक्रार
     प्रीत वेडी

मी प्रेम वेडी
करते प्रीत
जगा वेगळी
 आहे ती   रीत

माझ्या  मनीचे
कळावे तुला
का न उमजे
 खंत ती मला

 नव्याने किती
तुला सांगणे
तरी मनात
 न तेआणणे

किती अबोला
नको रुसवा
आण ना जरा 
मनी गोडवा

    नको मजला
नभीचे तारे
रहा जवळी
  मिळाले सारे 

वैशाली वर्तक 
अहमदाबादअ भा म सा परिषद समूह 2
आयोजित
उपक्रम क्रमांक 597
विषय ...किर्ती  महान
(पंचाक्षरी रचना)


असली जरी 
व्यक्ती लहान
असू शकते
*किर्ती महान*

कुठले काम
नसते कमी
याची सदाची 
बाळगा हमी

निष्ठा ठेवावी
सदा कामात
नाव मिळते
सदा विश्वात

शास्त्रींची होती
लहान मुर्ती
नावाजली ना?
जगात किर्ती


अढळ पदी
धृवाचे स्थान
भक्ती ने त्याला
मिळाला मान


वैशाली वर्तक
अहमदाबाद

मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०२१

एकांत ...बोल अनुभवाचे

*स्पर्धेसाठी*
कमलविश्व राज्यस्तर  स्पर्धा  साहित्य  समूह
*कमलविश्व राज्यस्तर स्टपर्धेसाठी*
विषय -- एकांत

          *बोल अनुभवाचे*

 सुरु होते रोजची दिनचर्या
जसे होताची सकाळ
देतो जीवाला मनःशांती
*एकांत* क्षण, सदा काळ     1


हवा हवासा वाटे मनाला
प्रत्येकाला  तो  एकांत
आठवणीत रमणे आवडे
म्हणूनच हवा, आधी निवांत       2

मिळविण्या ज्ञान , सिध्दी
 चित्ताला  एकांत  हवा
होता एकचित्त , सारे विसरता
एकाग्रता देते विचार  नवा            3

एकांत हवा वाटे नवयुगलांना
दोघांच्यात रममाण होण्यास
अडचण वाटे  , सदैव तिसरा
क्षणिक आनंद मिळविण्यास           4

रोजच्या धकाधकीच्या जीवनी
मिळवावा लागतो निवांत
तोच झालाय फार महाग
मग कुठला मिळणार *एकांत*         5


वैशाली वर्तक 
अहमदाबाद
8141427430
स्वरचित











सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१

कृष्ण जन्माष्टमी (गोकुळ सोहळा). अभंग

*स्पर्धेसाठी*
सावली प्रकाशन समूह,
षडाक्षरी काव्य लेखन स्पर्धा
विषय  - कृष्ण जन्माष्टमी
     
      *गोकुळ सोहळा*

कंस काराग्रही
देवकी नंदन
आठवा  जन्मला
करुया  वंदन                 1

वसुदेव निघे
नंदाच्या गोकुळी
यशोदेच्या घरी
यादवांच्या कुळी           2

निघाला असता
गोकुळ नगरी
चरण स्पर्शाने
नदी वाट करी           3

पुत्र  देवकीचा
आता झाला कान्हा
ठेवता पाळणी
यशोदेचा तान्हा         4

पाहूनी सावळे
हसरे मोहक
कृष्णची  वदती
चित्ताला वेधक               5

घरी येता कृष्ण 
जन झाले गोळा
कृष्ण जन्माष्टमी
गोकुळी  सोहळा                6

वैशाली वर्तक 
अहमदाबाद






अखंडित कल्याणकारी काव्य
आयोजित उपक्रम क्रमांक ४६
विषय ...कान्हा गोकुळीचा
 शीर्षक....गोकुळ सोहळा*

  जन्मे कंस कारागृही
  पुत्र देवकी नंदन
   कृष्ण नामे हो वदती
करु  तयाला  वंदन                 1

वसुदेव तयासवे
निघे गोकुळ नगरी
पुत्र   चरण स्पर्शाने            
नदी जल वाट करी.         २

वसुदेव देवकीचा
पुत्र आता झाला कान्हा
ठेवताच पाळण्यात 
यशोदेचा हसे तान्हा         ३

रुप पाहूनी सावळे
त्याचे  हसरे मोहक
 जन कृष्णची  वदती
 भासे चित्ताला वेधक              ४ 

 नंदा घरी येता कृष्ण 
जन नगराचे गोळा
 गोकुळात जन्माष्टमी
 केला  गोकुळी  सोहळा                ५

वैशाली वर्तक 
अहमदाबाद




कृष्ण जन्म...   अभंग
वसुदेव निघे / यशोदेच्या घरी/ नदी वाट करी/ होता स्पर्श 
पुत्र  देवकीचा /     येता नंदा घरी/ आनंद नगरी /  घरोघरी 
रुप ते सावळे / कृष्ण ची वदती / मोदे खुणावती / यशोदेला
जन्म  मथुरेला  /वाढला गोकुळी/ यादवांच्या कुळी / नंदलाला
हाते कुरवाळी /     खट्याळ  मोहक / चित्ताला वेधक /  घनश्याम
 घरी कृष्ण   येता/ जन सारे गोळा / जन्माचा सोहळा / साजरा तो

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...