शनिवार, १० डिसेंबर, २०२२

कलेचे जीवनी महत्त्व

माझी  लेखणी काव्या नगरी मंच
विषय - कलेचे जीवनी महत्त्व 
       *होऊ कलावंत*

एक कला तरी हवी
जीवनात अवगत
घ्यावी शिकून एखादी
व्हावे त्यात पारंगत


कला आहे महत्त्वाची 
 वाढवीते व्यक्तीमत्व
 देते मना विरंगुळा
चार लोकात प्रभुत्व 

चित्र , नाट्य अभिनय
खूप  करावे लेखन
कला शिकावी एखादी
असो वादन गायन


कुठलीही कला देते
समाजात नाव मान
वाढे सहज ओळख
जगी मिळतो सन्मान

  करी मोठे कलाकार 
मेहनत  अतोनात
 यश पडता पदरी
कलावंत   जीवनात


जाणा महत्त्व  कलेचे
करा   स्वतःला यशस्वी 
मिळवण्या मोद खरा
 मिळे आनंद मनस्वी


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

शुक्रवार, ९ डिसेंबर, २०२२

किलबिल

अ .भारतीय म हा प मध्य मुंबई समूह क्रमांक २
उपक्रम क्रमांक २९१
अष्टाक्षरी काव्यलेखन
विषय ..किलबिल
  शीर्षक..चिवचिवाट 

सोनसळी किरणांची. 
झाली  सुंदर पहाट 
सुरू झाली किलबिल
गोड तो किलबिलाट .

होता झुंजूमुंजू पहा
 करी पक्षी कलरव
पाना पानातून  ऐका
अलवार त्यांचा रव

दाणे टिपण्या निघती
पक्षी पक्षीण नेमाने
पिले साद  ती घालती 
रोज सकाळी प्रेमाने 

उष‌काल  मनोहर
थंड मंद वाहे वारा
किती सुंदर दृश्य ते
पहा निसर्ग पसारा
 
 कोण सांगते खगांना
 चला उठा झाली ऊषा
  करूनिया किलबिल
 दावी, पहा  पूर्व दिशा   .             

वैशाली वर्तक
अहमदाबाद

मंगळवार, ६ डिसेंबर, २०२२

अभंग मीरा/ सहाक्षरी /अष्टाक्षरी...मीरा...होते जिवाला काहिली

मीरा

मीरेचा गोपाल । 
वसे तो अंतरी  । 
मनाच्या मंदीरी । 
सर्व काळ  ।।                   1

हरी नाम गोडी । 
तिला बालपणी  । 
स्मरे तेच मनी । 
अविरत   ।।                       2


भजनी रंगूनी। 
सदा मीरा दंग। 
राही कृष्णा संग ।  
मनोमनी ।।                        3

मुखी सदा नाम । 
 एकची अधरी । 
बोलली  श्रीहरी । 
 नित्यनेमे  ।।                    4


 होई कृष्णमय । 
करिता साधना  । 
करी उपासना । 
श्रीहरीची  ।।               5

जळी स्थळी दिसे । 
 तीज एक मात्र  । 
कृष्णची सर्वत्र  । 
घनश्याम  ।।                 6


श्रीहरीची  पदे । 
मीराने रचली  । 
सकले गायली  ।  
प्रेमभावे    ।।                 7

 विष प्राशियता । 
 कोण तिज मारी ।   
 वसे  गिरीधारी   । 
अंतरंगी ।।                       8
            
कृष्णाच्या भक्तीत । 
आत्माचे अर्पण । 
 प्राण समर्पण । 
करियले    ।।                    9



सहाक्षरी

यारिया साहित्य कला समूह
विषय- एक होती मीरा


मीरेचा गोपाल
वसे तो अंतरी
तया वीण तिचा
दुजा नसे हरी

मुखी सदा नाम
एकच अधरी
गोपाळाची भक्ती
घेतली पदरी

 जळी स्थळी मीरा
 गोपालच पाही
कृष्णाच्या भक्तीत
सदा लीन राही

विष पण प्याली
 राजा तो गिरधारी
अंतरंगी वसे
कोण तिला मारी

नको तिला धन
मोतियांच्या सरी
 भजनात रंगे
 कृष्ण  राहे उरी

 सारे जन सांगे
झाली प्रेम वेडी
कृष्ण नामे तिने
बांधियली बेडी

एक होती मीरा
भक्तीत  जाणिली
दुजी राधाकृष्ण
नामे ओळखिली


वैशाली वर्तक



अष्टाक्षरी
*होते जिवाला काहिली*

वेड लागले  मीरेला
 पाही जळी स्थळी हरी 
दुजा कोणी  नको तिज
कृष्ण नावच अधरी


नको तिजलासंपदा
 गळा मोतीयांच्या सरी
 भक्ती भजनात रंगे
 गिरीधर  राहे उरी

मनी भक्ती श्रीहरीची
होई जिवाची काहिली
हरी नाम सदा ओठी
गीते हरीची रचिली


हरी नामे विष प्याली
  मनी राजा गिरधारी
तोची वसे अंतरंगी
मग कोण तिज मारी

एक अशी होती मीरा
जिला भक्तीत जाणिली
दुजी होती राधाकृष्ण
नामे जगी ओळखली




गुरुवार, १ डिसेंबर, २०२२

अभंग विरक्ती

कल्याण डोंबिवली महानगर 2
आयोजित
उपक्रम
अभंग लेखन
विषय... विरक्ती 

बोलायला सोपे  ! नसावी आसक्ती !
मनाची विरक्ती.  !  अवघड !

जन्मतः गुंतलो !  संसार सुखात !
आसक्ती मनात! सदाकाळ !

 मनी रूजवावी !   आध्यात्मिक गोडी  !  
  वैचारांची जोडी!     जुळतसे !

मनात रुजता  ! अध्यात्म विचार !
सहज साकार ! मनोभाव !

संसारिक  सुख! घरदार पैसा  !
मोह त्याचा ऐसा!   सुटेचिना !

पोरं लेकी बाळी ! पणतुंचे मुख !
पहाण्यात सुख !  मनीअसे.   !

अशी मनावस्था ! असता  अपार !
विरक्ती विचार. ! येई कैसा !

 वैशाली वर्तक
अहमदाबाद

बुधवार, ३० नोव्हेंबर, २०२२

आत्मविश्वास

कमलविश्व राज्यस्तर स्पर्धा साहित्य समूह
आयोजित नोव्हेंबर २०२२
मासिक भव्य राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा
विषय... आत्मविश्वास
शीर्षक.  *यशाची गुरुकिल्ली*


जीवनात महत्वाचा
ठरतो आत्मविश्वास
ज्याच्या बळावर यश
येते पदरी , हेच खास

बालपणी रूजवावा
मनातूनी *आत्मविश्वास* 
देत शिकवण मनाला
धरण्यास यशाचा ध्यास

करिता पराकाष्ठा प्रयत्नांची
आत्मविश्वास  येतोच मनी
 काम पूर्ण करीनच, अन् 
काम फत्ते होते त्याक्षणी.


गाठले एव्हरेस्ट शिखर 
मिळाली यशाला चाहुल
आत्म विश्वासाच्या बळावर
तेनसिंगने उचलले पाऊल.


असता आत्मविश्वास मनी
संचारते हत्तीचे मनात बळ
येवोत कितीही संकटे
मिळते उज्वल यशाचे फळ.

वैशाली वर्तक
अहमदाबाद


वरतीच कविता नाव बदलून


लालित्य नक्षत्र वेल समूह
आयोजित
विशेष उपक्रम 
विषय....निश्चितच
शीर्षक.  *यशाची गुरुकिल्ली*


जीवनात महत्वाचा
ठरतो आत्मविश्वास
ज्याच्या बळावर यश
येते पदरी , हेच खास

  
निश्चितता म्हणजेच
मनातून आत्मविश्वास 
महत्वाचा ठरे जीवनी
धरण्यास यशाचा ध्यास

  देते प्रयत्नांची पराकाष्ठा
आत्मविश्वास  निश्चितता मनी
 काम पूर्ण करीनच, अन् 
काम पण फत्ते होते त्याक्षणी.


गाठले एव्हरेस्ट शिखर 
मिळाली यशाला चाहुल
आत्म विश्वासाच्या बळावर
तेनसिंगने उचलले पाऊल.


असता निश्चितता मनी
संचारते हत्तीचे मनात बळ
येवोत कितीही संकटे
मिळते उज्वल यशाचे फळ.

वैशाली वर्तक
अहमदाबाद

बुधवार, २३ नोव्हेंबर, २०२२

आरोग्यम धनसंपदा

 अ भा म ठाणे जिल्हा  समूह १

उपक्रम -

विषय - आरोग्यम धनसंपदा


       जीवन मंत्र 

खरच असे कथन

आरोग्यम् धन संपदा

हवे निरोगीच  शरीर

न भासे कधी विपदा


देवाने दिधले शरीर

करावे तयाचे जतन 

स्वच्छ आहार  सेवन

 करा   नेमाने योगासन        


निद्रा ,आहार , व्यायाम

ठेवता सदा नियंत्रित 

नियमितता जीवनात 

जगा जीवन आनंदित


चणे आहेत भरपूर

पण दात नाही मुखात

असूनी धनश्री संपदा

 स्थिती होतसे  जीवनात


संतवाणी  सांगती सदा

  रहा मनाने समाधानी

     जीवन होईल वैभवी 

 जगाल सदैव आनंदानी 



वैशाली वर्तक 

अहमदाबाद

मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०२२

लेख एक प्रवास जीवनाकडे.

लालित्य नक्षत्र वेल
आयोजित
उपक्रम
विषय.. एक प्रवास जीवनाकडे


   खरच जीवन हा एक प्रवासच आहे. जन्म ते अंत काळ हा त्यांचा अवधी.. दिधला  जन्म मानवाचा तयात मेंदू बहाल केलाय देवाने ,सारासार विचार करण्यास. दिल्या आयुष्याचे सार्थक करावे.. नाहीतर, जीवन काय पशु प्राणी पण जगतात.
    पण हा जीवन प्रवास सार्थकी करता व आनंदे उपभोगता आला पाहिजे असे विचार
सहजची निवांतात बसली असता मनी आले. व मन  व्यतित जीवन प्रवासाच्या काळात डोकावले.
  खरच एक एक पाने उलगडता कळले प्रत्येक पान  होते सुंदर. विचार करता वाटे किती ते मनोहर.बालपणीची ती निरासगता आठवून मन आनंदित जाहले.नव्हते त्या जीवन प्रवासात हेवेदावे वा नव्हत्या चिंता वा  काळजी कुठल्याही क्षणाला.
    यौवनात आले .होते ते पान तर  गुलाबी तारुण्याचे.किती मोहक मनोहर रोजची नवी स्वप्ने . नवा दिवस ..नवी आशा आकांक्षा ..नव नव्या दिशा ..स्वप्न साकारण्यासाठी अंगी कर्तृत्वाची मनी अपेक्षा. 
  पुढे जीवन प्रवासात लाभलेला जीवन साथी. त्या बरोबर चे स्वप्नात रंगविलेले.....
           स्वप्नात रंगले मी 
           चित्रा त दंगले मी
         सत्यातल्या जगी या
         झोपेत जागले मी

        अशी भावगीतातल्या नायिके समान झालेला माझा जीवन प्रवास नजरेत आला.
कधी बागेत उगाच चाळा हाताला ..गवत खुडत ची ती स़ध्याकाळ  तर कधी समुद्र किनारी  वाळूत गप्पांच्या नादात रंगविलेली गुलाबी सांजवेळचा  आनंददायी
यौवन प्रवास  चलचित्रा प्रमाणे  अनुभवला. 
    मग कर्तृत्वाचे कर्तव्याचे दिन आठवले व मनोमनी हर्षित झाले. जगी कसा मान मिळविला. आई बाबांचे संस्काराचे गाठोडे कसे कामास आले ‌,याची वेळोवेळी जाण झाली .या सा-या प्रवासातील   अनुभवाचे गाठोडे घेत जीवन प्रवास करत होते 
अनुभवाचे गाठोडे पुन्हा त्या चुका न करण्यास उपयोगी ठरलेले प्रवासातील दिवस.
  असा जीवन प्रवास करत असता काय मिळविले तर समाधानी वृती. आता त्याच समाधानाचे जीवन प्रवासाचे पिवळे.. पण आनंद देणारे पान. या पर्यंत जीवन प्रवासात पोहचले. विधात्याने दिधले सारे काही. जीवन प्रवास आनंदी मनाने पार केला.
आणि पहाते तर खरंच सांजवेळ झाली होती. लगबगीने देवघराकडे वळले. 
समईतील ज्योती कडे पहात सुखद जीवन प्रवासासाठी. देवास वंदन केले 

देवास वंदन केले.

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...