शनिवार, १२ डिसेंबर, २०२०

गीत ...गंध तुझ्या प्रीतीचा (गीत)


गंध तुझ्या  प्रीतीचा

सहज सख्या   सांजवेळी, उजळल्या त्या आठवणी 18
दिन आले ते नजरेस , प्रीत गंधित झाली मनी     18


भेट आपुली ती पहिली , मन थोडे बावरलेले    18
पाहूनी विचलित मना, तूची मजला सावरलेले   18
स्मरता  गंध आठवांचा, हुरळून जाते  मनोमनी  19    
सहज सख्या सांजवेळी उजळल्या त्या आठवणी


दिले मना अनामिक सुख ,   त्या अश्वासक स्पर्शाने    18     प्रेमळ
करी धुंद आजही जीवा , मोहरते मन हर्षाने 18
मनी पालवी अंकुरली , मम हृदयाच्या अंगणी 18
सहज सख्या सांजवेळी उजळल्या त्या आठवणी


गंध तुझ्या  प्रीतीचा, दरवळे सदाची अंतरी   18
रोजच वसंत फुलतो अनुराग भरला उरी    18
आजही भासे तसाच फिरुनी नितदिनी जीवनी  18
सहज सख्या सांजवेळी उजळल्या त्या आठवणी

वैशाली वर्तक  12/12/20

गुरुवार, १० डिसेंबर, २०२०

6चांदण्यात चालताना/ नभीची चंद्रकोर/जरा चांदणे पांघरु/ टिपूर चांदणे!सुरांत चांद

महाराष्ट्र साहित्य  सुगंध  
१. विषय --चांदण्यातून चालतांना 

    **आगळाच आनंद*

 एक आगळा आनंद
चालतांना चांदण्यात
चमकती अगणिक 
तारे नभीच्या अंगणात

चंद्र चांदण्यांचा चाले
खेळ नभी लोभनीय
रुप खुले चंद्रासवे
चांदणीचे रमणीय

मंद वा-याची झुळुक
गंध दरवळे सुमनांचा
  हातात हात सखीचा
मनोहर खेळ चांदण्यांचा

अशा रम्य  चांदरात्री 
 प्रेमी युगल रमले
 भाव हळुच मनीचे 
 मुग्धपणे उमजले

   प्रकाशित आसमंत
   चंद्र तारे गगनात
   चांदण्याची  रात्र सारे
   घालविती आनंदात 

वैशाली वर्तक  8/12/20
अहमदाबाद


अ भा म सा प स्वप्नगंध समूह 
उपक्रमासाठी
२ विषय - जरा चांदणे पांघरु

एक आगळा आनंद
चालतांना चांदण्यात
चमकती अगणिक
तारे ते  नभांगणात

घेऊ आनंद ता-यांचा
लुकलुक करी तारे
शशी  हसून बघतो
वाटे पाहुनिया सारे

मंद वा-याची झुळुक
गंध पसरे फुलांचा
पाहू खेळ मनोहर
हात हातात सख्याचा

अशा  रम्य चांदरात्री
प्रेमी युगल रमले
भाव हळुच मनीचे
मुग्धपणे उमजले

चंद्र  चांदण्याचा चाले
खेळ नभी लोभनीय
जरा चांदणे पांघरु
चांदणीचे रमणीय

वैशाली वर्तक 
अहमदाबाद



३. नभीची चंद्रकोर

पहा कशी चंद्रकोर
नभी दिसे मनोहर
थंड मंद वात वाहे
तारे मंदावले क्षणभर

चंद्र चांदण्यांचा चाले
खेळ रात्री  लोभनीय
मनोहर चंद्रकोर 
तारे दिसती रमणीय

प्रकाशित आसमंत
चंद्रकोर रुपी शशी
दिसे किती तो शीतल
वाटे निहाळावी अशी

पसरली निरव शांतता
यामिनीने जोजविले जन
तिमीर रुपी पांधरुण
ओढुनिया शांत क्षण

 निशा येताची सरण्या
बिंब शशीचे मावळेल
लोपतील चांदण्या त्या
प्रकाश तयांचा मंदावेल
 

वैशाली वर्तक

४.  शुभ्र टिपूर चांदणे

आभाळाच्या गाभा-यात
शाळा असे चांदण्यांची
वाट पहाती सांजवेळी
अस्त होण्या आदित्याची      1


आल्या नभात लाजूनी
 एक एक करुनी हळुवार 
लुकलुक करीत जणू
दिवे लावियले अलवार               2


वाटे घ्याव्या  उचलूनी
भरुनिया ओंजळीत
हळुवार गुंफण्यास
फुले  म्हणूनी  वेणीत             3


जणु भरलीय शाळा
काळ्या काजळ आकाशी
चमचम करी तारे
खेळ खेळण्या चंद्राशी               4

किती दिसती लोभस
तारिकांचे   ते रुप रंग
आकर्षित करी जीवा
 मन होई   पहाण्यात दंग                5


शुभ्र टिपूर चांदणे
मोहाविते जन मना
एक एक तारिका त्या
आकर्षित  क्षणा क्षणा                6
    

चंद्र चांदण्यांचा चाले
खेळ नभी लोभनीय
रुप खुले चंद्रासवे
चांदणीचे रमणीय                      7






5
आ भा मसाप जिल्हा 2 समूह
आयोजित उपक्र
५. विषय ..ही रात चांदण्यांची

 नभी टिपूर चांदणे
 भासे  किती विलोभनीय
वाटे पहात बसावे
चमचम  ता-यांची शोभनीय

लुकलकत्या तारिका
शोभा ता-यांची आगळी
 फेर धरुनी सभोवती
होत्या शशीच्या जवळी.

भासे नक्षत्रांच्या राशी
जमल्या खेळण्या रास
रात्र होती पौर्णिमेची
चांदणे पांघरले नभी खास

सहज एकांतात सुचले
सुरेल सुंदर गाणे 
ही रात चांदण्याची
मनी   जागले तराणे

वैशाली वर्तक
अहमदाबाद
6
बॉर्डरलेस पॅथर्स साहित्य परिवार आयोजित 
एक दिवस कवितेचा अंतर्गत कविता लेखन स्पर्धा 
*स्पर्धेसाठी*
विषय ...चांदणचुरा
 ===============
शीर्षक ....शुभ्र टिपूर चांदणे


आभाळाच्या गाभा-यात
शाळा असे चांदण्यांची
वाट पहाती सांजवेळी
अस्त होण्या आदित्याची     1


आल्या नभात लाजूनी
 एक एक करुनी हळुवार 
लुकलुक करीत जणू
दिवे लावियले अलवार             2


वाटे घ्याव्या उचलूनी  
*चांदणचुरा* ओंजळीत
हळुवार गुंफण्यास
फुले  म्हणूनी  वेणीत             3


चंद्र  चांदण्याचा चाले
खेळ नभी लोभनीय
जरा चांदणे पांघरु
चांदणीचे रमणीय               4


अशा  रम्य चांदरात्री
प्रेमी युगल रमले
भाव हळुच मनीचे
मुग्धपणे उमजले.               5

सहज एकांतात सुचले
सुरेल सुंदर गाणे 
ही रात चांदण्याची
मनी   जागले तराणे.         6

    
वैशाली वर्तक.
 अहमदाबाद

बुधवार, ९ डिसेंबर, २०२०

काव्यांजली जीवन. | शोध

2..3..2..1 काव्यांजली
जीवन

मानव जन्माचे
करुया सदा सार्थक
नको निरर्थक 
कदापी

जीवनात  असे 
सदा ऊषा निशा
नको निराशा
मनी

सरीता पहा 
करिते कधी खंत
नसे उसंत
तिजला

गुलाबाचे जीवन
जरी असते काट्यात
सुख वाटण्यात
सदाकाळ

जडावावा छंद
जीवनी एखादा मनाला
मोद तनाला
होतअसे

आला पहा 
आनंदाचा उत्साहाचा क्षण
समजा सण
सदासाठी

भरलेला आनंद
आहे सा-या जगती
पहा सभोवती
शोधुनीया

फुलात  पानात
निसर्गाने  भरला मोद
मनाचा शोध
करावा

वैशाली वर्तक



भारतीय कोल्हापूर मंच 
उपक्रम क्रमांक २०२
दि १५\५\२४
विषय.  शोध


शोध घेण्याची
असावी ईच्छा प्रबळ
हवे मनोबळ
जीवनभर

घेण्या शोध 
बुध्दीला द्यावा जोर
नसावे कामचोर
कदापी

शोधक बुध्दीने
नसे शांती जीवाला 
शास्त्रज्ञांच्या मनाला 
सदाकाळ

 तज्ञांच्या मनात 
प्रश्न पडतील अनेक 
उलगडती एकेक
विचाराने

सदा विचारवंताची
बुध्दी असे शोधक
खरेची बोधक
जगताला.

 वैशाली वर्तक 
अहमदाबाद




रविवार, ६ डिसेंबर, २०२०

भ्रष्टाचारास आळा घालू. विचार वणवा भ्रष्टाचार आधारित

उपक्रम रचना
विषय - भ्रष्टाचाराला  आळा घालू

 
विषय - भ्रष्टाचाराला  आळा घालू


 रुजले जाते बालपणातच
बाळकडू भ्रष्टचाराचे
काम करुन घेण्यास 
दावी अमीष प्रलोभनाचे

भ्रष्ट वर्तन असे ...भ्रष्टाचार 
दिसतोय तो सर्व ची थरात
भ्रष्ट  असती सारे लहान महान
सर्व  तंत्रची,...सडलेले मुळात


वशिलेवाले जाती पुढे
 रहाती होतकरू मागे
देउन पैसा मिळवती जागा
बुद्धिमाना चे न जुळती धागे

भ्रष्टाचार करणा-याची
विवेक बुध्दी    होते नष्ट
भ्रष्टाचार  हाची शिष्टाचार
मानू लागलेय जग ,स्पष्ट

सारे मिळूनी करुया नष्ट 
जगुया सदा  स्वाभिमानाने
स्वकष्टाची  , आत्म बलाची
मिळवू भाकर  अभिमानाने


लावू  आता  एकची नारा 
*भ्रष्टाचाराला घालू आळा*
 भारत देश आपला प्यारा
मानवा , थांबव आता घोटाळा


भ्रष्टाचारास आळा घालण्या
जन जागृती करुया मिळूनी
तरच चांगली पिढी घडेल 
उद्या  नवा आदर्श  घेऊनी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

वैशाली वर्तक



सिद्ध साहित्यिक समूह आयोजित
उपक्रम
विषय .. विचार वणवा

होते बसले निवांत
 मनी माजले काहूर
 सुरू  थैमान विचारांचे
  झाला  मेंदूचा चक्काचूर 

 किती किती हा भ्रष्टाचार
 लहानांपासून मोठे सारे
 सर्व क्षेत्रात माजलेलाच
 रूप प्रत्येकाचे न्यारे

 सारे व्यवहार चालती
 टेबलाच्या खालूनी  सदा
 निती नियमांची नसे चाड
 स्वतःचा फायदा पाहती सर्वदा

कधी, कसे, केव्हा थांबणार
  जाळे  हे भ्रष्टाचाराचे 
जो तो  सांगे येथे विचार 
आपल्याच मोठेपणाचे

विचार करून करुन
पेटला वणवा विचारांचा
सांगा उपाय कसा मिळवू
मनी विचार ,निवांतांचा

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

शनिवार, ५ डिसेंबर, २०२०

अष्टाक्षरी काव्य चोरी

सावली प्रकाशन  समुह 
अष्टाक्षरी काव्य लेखन स्पर्धा

   काव्यचोरी

  लेखणीला द्यावी  धार
  विचारांना द्या प्रेरणा
  नका करु काव्य चोरी
  द्यावी बुध्दीला चेतना

  करा  साहित्य वाचन
  मिळे विचार नवीन  
  शब्द भंडार समृद्ध  शब्द होतील समृद्ध 
  येते लिखाणी प्राविण्य

  नको चोरी साहित्याची 
   शारदेचा ठेवा मान
   स्वरचित लिखाणास
   मिळे जगती सन्मान

    करी विचारांची चोरी
    दावी लिखाणी हुशारी
    शारदेच्या दरबारी
    करा भाषेची तयारी

    स्वरचित साहित्याने
    मोद मिळे मना खरा
    फुलविता शब्द मळा
    वाहे साहित्याचा झरा

वैशाली वर्तक 5/12/20
अहमदाबाद

गुरुवार, ३ डिसेंबर, २०२०

उंच जाई माझा झोका

मोहरली लेखणी साहित्य  समूह  आयोजित  भव्य 
काव्य लेखन स्पर्धा
विषय --उंच जाई माझा झोका


उंच  जाई माझा झोका

नसे सदा हिरवळ
कधी खडतर वाट
तर पहावी सुखद 
असा जीवनाचा थाट

पेलावीत आव्हाने ती  
टाका कष्टाचे पाऊल
उंच जाई झोका मग
लागे यशाची चाहुल

मनी जे जे कल्पियले
भाग्ये  दिला सदा मोका
झाले साध्य जीवनात
उंच गेला  माझा झोका


मिळविली निपुणता
घेता पाण्यात भरारी
आता करीते प्रयत्न 
देई लेखणी उभारी


जडे निवृत्त काळात
मिळे साथ लेखणीची
आवडीचा छंद जीवा
सेवा माय मराठीची


वैशाली वर्तक
अहमदाबाद 1/12/20

मंगळवार, १ डिसेंबर, २०२०

प्रकाश तारा (हायकू) निसर्ग

काव्यस्पंदन राज्यस्तर 02
विषय --प्रकाश तारा
हायकू रचना
**नभीचा तारा*

नभात तारा
येता सूर्य  आवरे
 त्याचा पसारा                 1

सांजवेळेला
वाहतो मंद वारा
चमके तारा                2

मंद लहरी
गीत गातोय वारा
अंगी शहारा                3

शशी येताच
दिपला नभी तारा
रात्री  पहारा                 4

वेगळी शान      
शशी संगे शोभतो
दैदिप्यमान                    5

वैशाली वर्तक
अहमदाबाद 15/11/20



***************************************

निसर्ग 

खरे पहाता
निसर्ग हाची देव
अमुल्य ठेव        1

देवे निर्मीला
निसर्ग  मनोहर
आहे सुंदर            2


निर्मीले देवे
सुंदरची  आकाश
देण्या प्रकाश        3

भास्कर  रवी            
अविरत नेमाने                                     
नित्य क्रमाने         4                             

 निसर्गा तुझी
 ठेव रे कृपा दृष्टी 
चालण्या सृष्टी         5

समतोलता
राखण्या  निसर्गाची
घेउ दक्षता               6

रवी शशी ते
उगवतात नित्य
सृष्टीचे सत्य            7

लाविता वृक्ष 
निसर्गची हिरवा
 रम्य बरवा              8

नदी सागर
देवाचे वरदान     
सुखी  घागर           9




अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...