शुक्रवार, २६ जून, २०२०

तव अस्तित्वाचा खेळ

शब्दरजनी साहित्य समूह आयोजित
स्पर्धेसाठी
विषय - अस्तित्वाचा खेळ



तुझ्या अस्तित्वाचा खेळ
आहे या जगती न्यारा
तूची घडवीशी तोडीशी
जगातील पसारा सारा

तुझ्या अस्तित्वाची जाण
मानावीच लागे सदा
सूर्य चंद्र तारे नभी
तूची निर्मिलेस सर्वदा

तुझ्या निर्मित सूर्याने
   ऋतु चक्र चाले नियमित
उजळते सृष्टी प्रकाशाने
 होतात बदल नवनित

आहेच खरच मजेचा
तुझ्या अस्तित्वाचा खेळ
मानव कितीही होता प्रगत
तव संमती शिवाय नसे मेळ

आता असुनही सारे सुरळीत
काय मांडलासी तू खेळ
सर्व जगाची तुला विनवणी
तव अस्तित्वाने बसव मेळ

वैशाली वर्तक       25/6/20

गुरुवार, २५ जून, २०२०

नदी मिळता सागरा / सागर चाराक्षरी. /सागर (प्रदीप)

नदी मिळता सागराला

येते धावत सरिता
मिळण्या ती सागराला
अर्पूनिया गोड पाणी
स्विकारे खा-या पाण्याला

देते जीवन प्राणी मात्रा
येताना वहात खळखळ
करते हिरवी शिवारे
येते पुढे पुढे अवखळ

विसरते अस्तित्व स्वतःचे
होता मिलन सागराशी
जाण्या बाष्परुपे आकाशी
एकरुप होते खारेपणाशी

घेउनिया रुप जलदाचे
जाते खेळाया नभात
ढगांची गट्टी डोंगराशी
पडे खाली पर्जन्य रुपात


वैशाली वर्तक :

सागर    चाराक्षरी

आजचा विषय  सागर


शीर्षक - रत्नाकर

वाटे सदा
ओळखीचा
साथी जणु 
जीवनीचा

किती तव
विशालता
भव्य दिव्य
अथांगता

लाटा येती 
फेसाळूनी
चूर होती
  त्या लाजूनी

त्या अधीर 
भेटण्यास
 धाव त्यांची
किना- यास

मोती रत्ने
मौल्यवान 
दडलेली
जणु खाण


म्हणूनीच 
ओळखती
रत्नाकर
संबोधती

मासे मारी
करितात
कोळीजन
सागरात

वैशाली वर्तक
प्रदीप वर्तक च्या कवितेवरून 
           सागरा  

अथांग विशालता गहिरता तुझी पाहूनी   16 
सागरा मन  बघ माझे आले उचंबळूनी        16

लाटा येती फेसाळूनी अधीर त्या भेटण्यास       16
लाजूनी विरूनी चूर होती येता किना-यास         16
हर्षे उल्हासे  सप्तरंगी जगतोस  रंगूनी           16
सागरा मन बघ माझे आले उचंबळूनी              16

अगणित मौल्यवान मोती दडले तव उरात        16
 शोधिता नसे अंत ना  पार थकती   गर्भात       16
ओळखती रत्नाकर नामे तुजला म्हणूनी           16
सागरा मन बघ  माझे  आले उचंबळूनी              16


भरती ओहोटी असे जरी  जीवनात  सदा       16
कसे  जमते न दावणे ओहोटी चे दुःख  कदा     17
गुढ अशी जीवन कहाणी गाजेत ऐकूनी           16
सागरा मन बघ माझे आले उचंबळूनी              16



वैशाली




चित्र काव्य ..पाहिले न कधी तुला


उपक्रम
विषय- पाहिले न मी तुला

पाहिले न मी तुला
 परी दृढ विश्वास तुजवरी
तूची आम्हासी पाहसी
कृपा दृष्टी आम्हावरी

जन्म मानव दिधला
करु तुझेच चिंतन
ध्यानी मनी तुझी आस
करतो तुझेच मनन,

दिधले सुंदर शरीर
हस्त करण्यास दान
नाम घेता तुझेची देवा
सदा हरपते भान

तव कृपेने चंद्र सूर्य
होते नित उषा निशा
 खेळ हा दिनरातीचा
फुलविशी दाही दिशा


वैशाली वर्तक

ही कविता श्रद्धा, भक्ती आणि संपूर्ण समर्पण व्यक्त करणारी आहे. "पाहिले न मी तुला, परी दृढ विश्वास तुजवरी" या ओळींमध्ये अदृश्य तरीही जाणवणाऱ्या ईश्वराच्या अस्तित्वावर दृढ विश्वास दिसून येतो.

ईश्वराने दिलेल्या जीवन, शरीर, आणि संधींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण कवितेतून प्रकट होते. "नाम घेता तुझेची देवा, सदा हरपते भान" या ओळीत भक्तीची तीव्रता आणि नामस्मरणाची शक्ती अधोरेखित होते.

शेवटच्या ओळींमध्ये चंद्र-सूर्य आणि दिन-रात्रीच्या चक्रातही ईश्वराच्या कृपेची अनुभूती सुंदर शब्दांमध्ये व्यक्त झाली आहे. एकूणच, ही भावनिक, भक्तिरसाने ओथंबलेली आणि अंतर्मुख करणारी कविता आहे.
_------------------------------------------------------------------------
वरची कविता कडवे वाढवून 




कमलविश्व राज्यस्तर स्पर्धा साहित्य समूह 
आयोजित जानेवारी २०२६ मासिक भव्य राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा 
*स्पर्धे साठी*
विषय ... निष्ठा/. निष्ठावंत 
३१\१\२६
अष्टाक्षरी रचना

 शीर्षक...पाहिले न मी तुला

पाहिले न मी तुला
 परी दृढ *निष्ठा* तुजवरी
तूची आम्हासी पाहसी
कृपा दृष्टी आम्हावरी.

जन्म मानव दिधला
सदा  तुझेच चिंतन
ध्यानी मनी तुझी आस
करते तुझेच मनन,

दिधले सुंदर शरीर
हस्त करण्यास दान
नाम घेता तुझेची देवा
सदा हरपते भान

तव कृपेचे चंद्र सूर्य
करी नित्य उषा निशा
 खेळ हा दिनरातीचा
फुलविशी दाही दिशा.

 तुझ्या निष्ठेने पाहते
आयुष्याची संध्याकाळ 
 आहे तूची *निष्ठावंत* 
 मानीते मी सदाकाळ.


वैशाली वर्तक.
अहमदाबाद.
८१४१४२७४३०

रविवार, २१ जून, २०२०

मैफील वाद्यांची/. टाळ


यारिया साहित्य समुह
अष्टक्षरी रचना
स्पर्धा फेरी क्र 2
विषय- चित्र काव्य
 शीर्षक- **रंगत वाद्यांची**

 गायनाच्या मैफिलीला
  येते रंगत वाद्यांनी
रंग खुलवी चित्रास
वाद्ये जादुमय स्वरांनी

  सुरु करताच गाणे
  पेटी धरे तिचे सूर
  साथी मृदुंग बासरी
  रंगे मैफील मधुर

 भजनात, किर्तनात
हवी साथ तबल्याची
साज चढवे बासरी
मजा वाढे गायनाची

नर्तनाची मजा वाढे
ढोलकीच्या तालावर
भान हरपून श्रोते
साथ देती ठेक्यावर


असे वीणा तंतुवाद्य
प्रिय ती सरस्वतीला
स्वर छेडिता विणेने
मिळे आनंद मनाला

वैशाली वर्तक
अहमदाबाद


अभा मी सा प समूह २
आयोजित उपक्रम
विषय... टाळ


 चित्र  जैसे आकर्षक
नाना रंगांनी खुलते 
 वादनाच्या संगतीत
तैसे संगीत रंगते

पेटी, तबला ,चिपळ्या
अभा मी सा प समूह २
आयोजित उपक्रम
विषय... टाळ


 चित्र  होते आकर्षक
नाना रंगांनी खुलते 
 वादनाच्या संगतीत
तैसे संगीत रंगते

पेटी, तबला ,चिपळ्या
टाळ हवी भजनात 
गोडी वाढवी  गाण्याची 
मंत्र मुग्ध करण्यात

स्वर देत संगीतात
गोड साथ देई  टाळ 
विसरुन देहभान
किती जातो वेळ काळ

टाळ चिपळ्यांच्या संगे
होई दंग तुकाराम
 रंगे भजनी -किर्तनी
 मुखी सदा विठु नाम

ताल लय साधावी लागते
टाळ वाद्य जरी लहान
मिळण्यास गायनी दाद
टाळ  करी काम महान

वैशाली वर्तक
अहमदाबाद




काव्य निनाद साहित्य मंच पुणे आयोजित उपक्रम 
साहित्यिक उपक्रम क्रमांक 821
3/6/326
विषय ... सुरांच्या चांदण्यात 
 शीर्षक- **रंगत वाद्यांची**

 गायनाच्या मैफिलीला
  येते रंगत वाद्यांनी
रंग खुलवी चित्रास
वाद्ये जादुमय स्वरांनी

स्वर धरता गायक
वाद्ये ही  सरसावती
साथ स्वरांना देण्यास 
स्वर  चांदण्या उजळती


  सुरु करताच गाणे
  पेटी धरे तिचे सूर
  साथी मृदुंग बासरी
  रंगे मैफील मधुर

 भजनात, किर्तनात
हवी साथ तबल्याची
साज चढवे बासरी
मजा वाढे गायनाची

नर्तनाची मजा वाढे
ढोलकीच्या तालावर
भान हरपून श्रोते
साथ देती ठेक्यावर


असे वीणा तंतुवाद्य
प्रिय ती सरस्वतीला
स्वर छेडिता विणेने
मिळे आनंद मनाला

वैशाली वर्तक
अहमदाबाद






 

शनिवार, २० जून, २०२०

तुळस

 तुळस अष्टाक्षरी

   तुळस

शोभा वाढवी घराची
जेथे तुळस अंगणी
सदा राखते आरोग्य
जपा तिला मनोमनी

सांजवेळी लावताच
दिवा ज्योत वृंदावनी
 घरातून प्रसन्नता
राहे सदा मनातूनी

नाव घेता प्रसादाचे
 तुळशीचे हवे पान
होत नाही पूर्ण तोची
असा तिचा असे मान

जपताना पवित्रता
आरोग्यास गुणकारी
सर्दी खोकला पळवी
देई स्वास्थ्य घरीदारी

विठ्ठलाच्या शोभे गळा
 सदा तुळशीच्या माळा
आवडीने अर्पिलेल्या
दिसे सुंदर सावळा

वैशाली वर्तक


चित्र काव्य प्रौढ शिक्षण

उपक्रम
चित्र काव्य

बघा कशा ताई माई
मिळूनी अक्षरे गिरविती
मनी दृढ ईच्छा शिकण्याची
साक्षरतेची महती जाणिती

वयाचे नसते शिकण्या बंधन
असता मनी ईच्छा प्रबळ
प्रौढत्वातही होऊन शिक्षीत
करु उर्वरीत आयुष्य उज्वल


 नसे कमी पणा केव्हाही शिकण्यास
ठोठविले द्वार प्रौढ शाळेचे आता
होऊनी साक्षर दावु समाजास
शिक्षीत होऊ जाता जाता

शिक्षण सदा असे फायदेमंद
नको वाटे ते परावलंबी जीणे
साध्या सोप्या व्यवहारास्तव
नको दुजा ओंजळीने पाणी पीणे

म्हणूनच आलो सा-या मिळूनी
घेण्या शिक्षण प्रौढ शाळेतूनी
लावू एक एक साक्षर पणती
मिण मिणेल ती घरा -घरातूनी

वैशाली वर्तक

शनिवार, १३ जून, २०२०

गुलमोहर

सिद्ध लेखिका समूह आयोजित उपक्रम
काव्यलेखन
विषय-गुलमोहर
      *स्थितप्रज्ञ*
लालबुंद पाकळ्यात
उभा स्थित प्र ज्ञ जसा
टळटळत्या उन्हात
दावी जीवनाचा ठसा


साहूनिया तप्त झळा
उन्हाळ्यात बहरतो    
काय असते जगणे
सर्व जनास दावतो


थकलेल्या भागलेल्या
 जीवा देतोस दिलासा
दुःख सहून मगच
जगी सुखाचा खुलासा

 हर्ष दाटे पाहताच
वाटे मना क्षणभर
 पाहूनीया तो मोहर
दूर होईना नजर

लागे मनास वेडच
लालकेशरी रंगात
सर्वाहूनी वेगळाच
भासे आगळ्या ढंगात

वैशाली वर्तक

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...