मंगळवार, ३० ऑक्टोबर, २०१८
शुक्रवार, १२ ऑक्टोबर, २०१८
माझी आवड लिनाक्षरी
लिनाक्षरी काव्य स्पर्धा
विषय .. माझी आवड
लिहीण्याची असे आवड मजला,
पण कशी करु मी , साध्य तिजला.
आधी शोधली लेखणी लिहीण्यास ,
गेला किती वेळ, तिला शोधण्यास .
प्रश्न पडला आता तो विषयाचा
कशावरी लिखाण , करू तयाचा.
विचारांती ठरले लिहू चारोळी,
मग विचारात घेऊया आठोळी.
"मांदियाळी साहित्य " आला धावूनी,
लिहीण्यास छान , विषय देवूनी.
साकारली 'लिनाक्षरी'ने आवड,
जुळवित गेले शब्दांची सांगड.
वैशाली वर्तक (अहमदाबाद)
विषय .. माझी आवड
लिहीण्याची असे आवड मजला,
पण कशी करु मी , साध्य तिजला.
आधी शोधली लेखणी लिहीण्यास ,
गेला किती वेळ, तिला शोधण्यास .
प्रश्न पडला आता तो विषयाचा
कशावरी लिखाण , करू तयाचा.
विचारांती ठरले लिहू चारोळी,
मग विचारात घेऊया आठोळी.
"मांदियाळी साहित्य " आला धावूनी,
लिहीण्यास छान , विषय देवूनी.
साकारली 'लिनाक्षरी'ने आवड,
जुळवित गेले शब्दांची सांगड.
वैशाली वर्तक (अहमदाबाद)
बुधवार, २६ सप्टेंबर, २०१८
उदार.....सुधाकरी
सुधाकरी
उदार
सृष्टी पहा कशी l सतत उदार ll
सहुनीया भार l उदात्तेने ll
लता वेली वृक्ष l सदा बहरुन. l
करिती संपन्न l जगतास ll
अर्पूनिया दान l प्रकाशती सारे l
चंद्र सूर्य तारे l गगनात ll
माय बाप सदा l करिती वर्षाव l
जाणिजे स्वभाव l लेकरांचा ll
देवाने दिधले l आपणास रास l.
द्यावे दुस-यास l हाची धर्म ll
असावे उदार l सदा सर्वजण l
हीच शिकवण l निसर्गाची ll
उदार म्हणोनी l जगती महान l
दानवीर कर्ण l दानशूर. ll
वैशाली वर्तक
उदार
सृष्टी पहा कशी l सतत उदार ll
सहुनीया भार l उदात्तेने ll
लता वेली वृक्ष l सदा बहरुन. l
करिती संपन्न l जगतास ll
अर्पूनिया दान l प्रकाशती सारे l
चंद्र सूर्य तारे l गगनात ll
माय बाप सदा l करिती वर्षाव l
जाणिजे स्वभाव l लेकरांचा ll
देवाने दिधले l आपणास रास l.
द्यावे दुस-यास l हाची धर्म ll
असावे उदार l सदा सर्वजण l
हीच शिकवण l निसर्गाची ll
उदार म्हणोनी l जगती महान l
दानवीर कर्ण l दानशूर. ll
वैशाली वर्तक
सोमवार, २४ सप्टेंबर, २०१८
मंगळवार, १८ सप्टेंबर, २०१८
सुधाकरी (अभंग) गणेश- वंदना - स्तुती .
सुधाकरी...
गणेश वंदना -स्तुती 18/9/2018
कार्यारंभी तुज !
प्रथम पुजितो l
तुलाच स्मरतो ll
विध्नेश्वरा l
वंदन करोनी l
मागते तुजला l
बुध्दी दे मजला !
ज्ञानदाता ll
लावूनी चंदन l
चर्चीत शेंदूर l
वाहू दुर्वांकूर l
तुजेलागी ll
सर्व व्यापी तूची l
तूची लंबोदर l
ज्ञानाचा सागर l
तू ओंकारा ll
चौदा कलेंचा !
तूची अधिपती l
करिते विनंती l
तुजेपायी ll
राहो आम्हावरी l
तव कृपा दृष्टी l
नको करु कष्टी l
कदाकाळ ll
तूची असे कर्ताl
तूची करविता l
शरण मी आताl
भगवंता ll
वैशाली वर्तक
गणेश वंदना -स्तुती 18/9/2018
कार्यारंभी तुज !
प्रथम पुजितो l
तुलाच स्मरतो ll
विध्नेश्वरा l
वंदन करोनी l
मागते तुजला l
बुध्दी दे मजला !
ज्ञानदाता ll
लावूनी चंदन l
चर्चीत शेंदूर l
वाहू दुर्वांकूर l
तुजेलागी ll
सर्व व्यापी तूची l
तूची लंबोदर l
ज्ञानाचा सागर l
तू ओंकारा ll
चौदा कलेंचा !
तूची अधिपती l
करिते विनंती l
तुजेपायी ll
राहो आम्हावरी l
तव कृपा दृष्टी l
नको करु कष्टी l
कदाकाळ ll
तूची असे कर्ताl
तूची करविता l
शरण मी आताl
भगवंता ll
वैशाली वर्तक
बुधवार, ५ सप्टेंबर, २०१८
ज्वारीचे कणीस
नातवास देण्यास प्रात्यक्षिक ज्ञान
कशी येते भाकरी ताटात
शेतकरी करतो पेरणी कशी
कणसे कशी डौलतात शेतात
सहज टाकले ज्वारीचे दाणे चार
रोज देता पाणी तयास नियमित
रुजलेकी दाणे जमिनीत छान
इवलेसे अंकुरले कोंब काही दिवसात
पहाता पहाता वाढले ते रोप
दिसेल ना डौलदार कणीस एकतरी
याची वाट पाहिली दोघांनी मिळूनी
पण आज सहज लक्ष जाता
दिसले की दाणेदार कणीस उंचावरी
पाहून झाला आनंद अमुच्या मनीं
वैशाली वर्तक
कशी येते भाकरी ताटात
शेतकरी करतो पेरणी कशी
कणसे कशी डौलतात शेतात
सहज टाकले ज्वारीचे दाणे चार
रोज देता पाणी तयास नियमित
रुजलेकी दाणे जमिनीत छान
इवलेसे अंकुरले कोंब काही दिवसात
पहाता पहाता वाढले ते रोप
दिसेल ना डौलदार कणीस एकतरी
याची वाट पाहिली दोघांनी मिळूनी
पण आज सहज लक्ष जाता
दिसले की दाणेदार कणीस उंचावरी
पाहून झाला आनंद अमुच्या मनीं
वैशाली वर्तक
स्पर्धा तील काही साहित्य
[28/08 16:21] Vaishali Vartak: स्पर्धेसाठी.....
रक्षाबंधन......
सुधाकरी (अभंग )
आठोळी
सण असे राखी l भाऊ बहिणीचा l
रेशमी धाग्याचा l राखीपौर्णिमा ll
दोन ही मनांचे l अतूट बंधन. l
प्रेमळ नात्याचे l रक्षाबंधन ll
नारळी पौर्णिमा l असेही वदती l
पूजन करिती l सागराचे ll
असे अन्नदाता l कोळी जनतेचा l
पोषितो तयांना l सदाकाळ ll
मंगळागौरी....
दुनोळी.......
चला ग सा-या वशेळयांनो करु आज पुजन मंगळागौरीचे,
मनो भावे करुनी पूजा खेळ खेळून दर्शन घडवू संस्कृतीचे .
गोपालकाला / दही हंडी ....
चारोळी
आला हो दही हंडीचा सोहळा
दिसती रस्या रस्त्यातूनी गोविंदा
लगबगीने धरूनी हात हाती
संघटन शक्तीने दही हंडी फोडती
........... वैशाली वर्तक
अहमदाबाद
[02/09 12:05] Vaishali Vartak: चित्र चारोळी स्पर्धेसाठी..
कृष्णजन्म
देवकी पुत्र आणिला गोकूळी
नंद यशोदा आनंदली मनीं
प्रेमाने कुरवाळी बाळकृष्णासी
युगपुरुष ठरला हाचि जगीं
चित्र चारोळी स्पर्धेसाठी..
दहीहंडी.
दही हंडीचा असे आज दिन
सर्वत्र दिसती गोविंदा पथक
लगबगीने रचिता मनोरे उंच
एकजूटीने फोडली हंडी सहज
वैशाली वर्तक.
अहमदाबाद
रक्षाबंधन......
सुधाकरी (अभंग )
आठोळी
सण असे राखी l भाऊ बहिणीचा l
रेशमी धाग्याचा l राखीपौर्णिमा ll
दोन ही मनांचे l अतूट बंधन. l
प्रेमळ नात्याचे l रक्षाबंधन ll
नारळी पौर्णिमा l असेही वदती l
पूजन करिती l सागराचे ll
असे अन्नदाता l कोळी जनतेचा l
पोषितो तयांना l सदाकाळ ll
मंगळागौरी....
दुनोळी.......
चला ग सा-या वशेळयांनो करु आज पुजन मंगळागौरीचे,
मनो भावे करुनी पूजा खेळ खेळून दर्शन घडवू संस्कृतीचे .
गोपालकाला / दही हंडी ....
चारोळी
आला हो दही हंडीचा सोहळा
दिसती रस्या रस्त्यातूनी गोविंदा
लगबगीने धरूनी हात हाती
संघटन शक्तीने दही हंडी फोडती
........... वैशाली वर्तक
अहमदाबाद
[02/09 12:05] Vaishali Vartak: चित्र चारोळी स्पर्धेसाठी..
कृष्णजन्म
देवकी पुत्र आणिला गोकूळी
नंद यशोदा आनंदली मनीं
प्रेमाने कुरवाळी बाळकृष्णासी
युगपुरुष ठरला हाचि जगीं
चित्र चारोळी स्पर्धेसाठी..
दहीहंडी.
दही हंडीचा असे आज दिन
सर्वत्र दिसती गोविंदा पथक
लगबगीने रचिता मनोरे उंच
एकजूटीने फोडली हंडी सहज
वैशाली वर्तक.
अहमदाबाद
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
अलिप्तता व दुर्लक्षता
अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत. .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही तो लहानाचा मोठा होतो. ...
-
उषाताई. आठवणी येतात अलवार मृदु शब्द कानी दाटलेली मनी सख्यांची आस हं, बोल उषाताई काय म्हणतेस? उगाच होतात असे अजूनही भास. कारण आहेच त...
-
विश्व लेखकांचे साहित्य मंच पुणे प आयोजित दोन दिवसीय उपक्रम 9/2/26 (1) विषय ...पहिली वही पादाकुलक वृतांत सहज काढला ,आवरायला निवांतात खण ,फ...
-
मोहरली लेखणी साहित्य समूह आनंद कंद वृत्तात 1 विषय दु:ख सुखदुःख येत राही, दिन आठवा सुखाचे. नाही जगात कोणी,ज्याला न दिन पिडेचे संतोषिला मनान...





























